खडवली वासिंद मार्गावर ७० वर्षांच्या जुन्या पुलाचे पुनर्वसन आणि पुशिंग पद्धतीने भुयारी मार्ग बांधला

By अनिकेत घमंडी | Published: March 5, 2024 05:08 PM2024-03-05T17:08:39+5:302024-03-05T17:08:56+5:30

वासिंद - आसनगाव सेक्शनमध्ये असलेले लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक ६४, काढून त्याच्या जागी भुयारी मार्ग बांधण्यात आला.

Rehabilitation of 70 years old bridge on Khadvali Vasind Marg and construction of subway by pushing method | खडवली वासिंद मार्गावर ७० वर्षांच्या जुन्या पुलाचे पुनर्वसन आणि पुशिंग पद्धतीने भुयारी मार्ग बांधला

खडवली वासिंद मार्गावर ७० वर्षांच्या जुन्या पुलाचे पुनर्वसन आणि पुशिंग पद्धतीने भुयारी मार्ग बांधला

डोंबिवली - रेल्वे पथकाने - अभियंता, पर्यवेक्षक आणि कामगार यांच्या पथकाने खालील दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधांची कामे यशस्वीपणे पूर्ण केली आहेत. खडवली ते वासिंद दरम्यान ७० वर्षे जुन्या मोठ्या स्टील गर्डर पुलाची पुनर्बांधणी केली. तसेच  पुलाखालील रस्ता पुशिंग पद्धतीने बांधून लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक ६४ काढून टाकले. त्याबाबत मंगळवारी रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार खडवली आणि वासिंद दरम्यान ७० वर्षे जुन्या मोठ्या स्टील गर्डर पुलाचे पुनर्वसन करण्यात आले.

खडवली आणि वासिंद दरम्यानचा स्टील गर्डर ब्रिज क्र. बीआर ७३/२, जो सुमारे ७० वर्षे जुना होता, तेथे  दोन्ही मार्गावरील सध्याच्या २ गर्डरच्या जागी २ रिटेनर टाकून ते बदलण्यात आले. भौगोलिक आणि तांत्रिक आव्हाने असतानाही, २२० टन वजन क्षमतेच्या क्रेनने हे काम यशस्वीपणे पूर्ण केल्याचे सांगण्यात आले. पुशिंग पद्धतीने पुलाखालील रस्ता बांधून लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक ६४ काढून टाकले.

वासिंद - आसनगाव सेक्शनमध्ये असलेले लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक ६४, काढून त्याच्या जागी भुयारी मार्ग बांधण्यात आला. वळणाच्या वर्तुळाकार भागात क्लिष्ट स्थान असूनही, आरसीसी बॉक्स पुशिंगसाठी पुश थ्रू पद्धतीमध्ये आरएच गर्डरऐवजी १५ मी. रेल क्लस्टर वापरून काम यशस्वीरित्या पार पाडण्यात आले. ही पायाभूत सुविधांची कामे अप आणि डाउन ईशान्य मार्गांवर शनिवार, रविवारच्या मध्यरात्री घेण्यात आलेल्या विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक दरम्यान करण्यात आली.

Web Title: Rehabilitation of 70 years old bridge on Khadvali Vasind Marg and construction of subway by pushing method

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.