शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

रिसेप्शनिस्ट मारहाण प्रकरण: गोकुळचा ताबा पोलिसांकडेच, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 09:26 IST

रिसेप्शनिस्ट मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रंजीत यांना शुक्रवारी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

कल्याण : रिसेप्शनिस्ट मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रंजीत यांना शुक्रवारी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. आरोपी रंजीत याने जामिनासाठी अर्ज केला असून, त्यावर न्यायालयाने पोलिस, सरकारी वकिलांचे मत मागितले आहे. रिसेप्शनिस्ट मारहाण प्रकरणात गोकुळ आणि त्याचा भाऊ रंजीत यांच्या दोन दिवसांच्या पोलिस कोठडीची मुदत शुक्रवारी संपली. गोकुळ हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. त्याच्या तपासासाठी पोलिसांनी सात दिवसांची पोलिस कोठडी मिळावी, अशी विनंती केली. आडिवली-ढोकळी भागात बिल्डिंगमध्ये पाणी सोडण्याचे काम करणाऱ्यावर गोकुळ आणि त्याच्या साथीदारांनी धारदार हत्याराने हल्ला केला होता. या गुन्ह्यात गोकुळ फरार होता. या प्रकरणात पाेलिसांनी त्याचा ताबा न्यायालयाकडून घेतला. गोकुळला शनिवारी पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे,

तपास अधिकारी बदलण्यासाठी अर्जपोलिसांच्या तपासावर पीडितेचे वकील ॲड. हरीष नायर यांनी नाराजी व्यक्त केली असून, या गुन्ह्याचा तपास अधिकारी बदलण्याची मागणी पीडितेने पोलिस उपायुक्तांकडे केली.

मुजोर आरोपीची पत्रकारांना धमकीगोकुळने बुधवारी न्यायालयात अरेरावी केली होती. शुक्रवारीही त्याची मुजोरी पाहायला मिळाली. त्याला मानपाडा पोलिस ठाण्यातून न्यायालयात नेताना त्याने बेड्या घालण्यास नकार दिला. तसेच, चेहऱ्यावर फडके गुंडाळण्यास मनाई करत पोलिसांशी वाद घातला. कोठडीतून बाहेर आल्यावर त्याने स्थानिक पत्रकारांना ‘तुम्ही चुकीचे केलेय, आपली लवकरच भेट होईल,’ अशी धमकीही दिली.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलkalyanकल्याण