शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

डोंबिवलीमधील महिलेनं साकारली सप्तश्रृंगी देवीची रांगोळी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2021 6:53 PM

डोंबिवलीतील एमआयडीसी परीसरातील एकदंत हेरिटेज येथे राहणा-या स्मिता साळुंखे या एक कलाशिक्षिका आहेत. लहानपणापासूनच त्यांना रांगोळीची आवड होती.

कल्याण- सांस्कृतिक नगरी डोंबिवली शहरात  प्रत्येक सण मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. या शहराला अनेक कलावंत लाभले आहेत. हे कलावंत नेहमीच  सण उत्सवाच्या निमित्ताने आपल्या कलेच्या माध्यमातून एक नवचैतन्य निर्माण करत असतात.सध्या  नवरात्र उत्सव सुरू आहे. आणि याच औचित्य साधत डोंबिवलीतील एका महिलेनं वणीच्या सप्तश्रृंगी देवी अगदी हुबेहूब रांगोळीच्या माध्यमातून साकारली आहे. ही रांगोळी पाहून ही खरंच  रांगोळी आहे की पेंटिंग ? असा विचार तुमच्या सुद्धा मनात आल्याशिवाय राहणार नाही. 

डोंबिवलीतील एमआयडीसी परीसरातील एकदंत हेरिटेज येथे राहणा-या स्मिता साळुंखे या एक कलाशिक्षिका आहेत. लहानपणापासूनच त्यांना रांगोळीची आवड होती. सुरवातीला त्या  ठिपक्यांच्या भव्यदिव्य  रांगोळी काढायच्या.आता सगळीकडे पोस्टर आणि पोर्ट्रेटच्या रांगोळ्या काढल्या जात असल्याने स्मिता यांनी देखील अशा रांगोळ्या काढण्याचा प्रयत्न केला. विशेष बाब म्हणजेरांगोळीचे वेगळे कोणतेही प्रशिक्षण त्यांनी  घेतले नाही. परंतु रंगसंगती, शेडिंग, स्केचिंग यांचे ज्ञान असल्याने त्याचा उपयोग  त्यांना रांगोळी काढताना झाला.

स्मिता यांनी साकारलेल्या सप्तश्रृंगी देवीची रांगोळी सध्या चर्चेचा विषय झालीये. कारण देवीच्या  दागिन्यांपासून ते हावभाव हे सर्व  बारकावे अगदी हुबेहूब रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात आलेत.रांगोळीतुन जणू काही देवीचे सजीव रूपच अवतरले असा प्रतिसाद प्रेक्षकांकडून  मिळतोय.देवीची ही रांगोळी 4 X4  फूट आकारात साकारण्यात आलीये. ही रांगोळी पाहण्यासाठी अनेक देवीभक्त येत असून  आपल्या कलेची आवड प्रत्येकानं जोपासली पाहिजे असं मत स्मिता यांनी व्यक्त केलंय.

टॅग्स :Navratriनवरात्रीkalyanकल्याण