शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथच्या कोविड रुग्णालयात होतोय रेमडेसिविरचा काळाबाजार, मनसेचे स्टिंग ऑपरेशन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 08:00 IST

शनिवारी रात्री पालिकेच्या कोविड रुग्णालयाबाहेर मनसेच्या कार्यकर्त्यांनी इंजेक्शन विकणाऱ्यावर सापळा रचला होता. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या गेटवर चिठ्ठी पाठवून इंजेक्शन हवे आहे, असा संदेश आतमध्ये पाठवला होता.

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या कोविड रुग्णालयातून रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची बाब समोर आली आहे. या रुग्णालयात रुग्णवाहिकेच्या चालकाने दोन रेमडेसिविर बाहेरील व्यक्तीला विकण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले असून त्याला रंगेहात पकडण्यात आले आहे.शनिवारी रात्री पालिकेच्या कोविड रुग्णालयाबाहेर मनसेच्या कार्यकर्त्यांनी इंजेक्शन विकणाऱ्यावर सापळा रचला होता. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या गेटवर चिठ्ठी पाठवून इंजेक्शन हवे आहे, असा संदेश आतमध्ये पाठवला होता. ही चिठ्ठी मिळताच अवघ्या १५ मिनिटांत या ठिकाणावरून मनसेच्या कार्यकर्त्यांना कॉल आला आणि त्यांनी दोन रेमडेसिविर इंजेक्शनसाठी तब्बल ४० हजार रुपयांची मागणी केली. रुग्णालयाबाहेर रुग्णवाहिकेच्या चालकाने दोन रेमडेसिविर मनसेच्या कार्यकर्त्यांना देताच कार्यकर्त्यांनी त्याला पकडून नेमके हे इंजेक्शन आले कुठून, याबाबत माहिती घेतली. तसेच यासंदर्भात पालिका प्रशासनालादेखील माहिती दिली. ही माहिती मिळताच पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून नेमके हे इंजेक्शन आले कुठून, त्याची माहिती घेऊन संबंधितांनादेखील आरोपी करण्याची मागणी केली आहे.पालिकेच्या कोविड रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी या इंजेक्शनचा काळाबाजार केला असला तरी ज्या कंपनीचे इंजेक्शन बाहेर विकण्यासाठी काढण्यात आले होते ते इंजेक्शन डेंटल कॉलेजच्या कोविड केअर सेंटर मध्ये कधीच आले नाही असा दावा येथील डॉक्टरांनी केला आहे. हे इंजेक्शन नेमके कोठून आले आणि त्या रुग्णवाहिकेच्या चालकाला कोणी दिले याचा शोध घेण्याची गरज व्यक्त होत आहे. दुसरीकडे या रुग्णालयात काम करणारे कर्मचारी या इंजेक्शनचा काळाबाजार करीत असल्याच्या अनेक तक्रारी याआधी देखील प्राप्त झाल्या होत्या, मात्र कोणत्याही कर्मचाऱ्याला रंगेहात पकडले न गेल्याने ही बाब उघडकीस आली नव्हती. हे इंजेक्शन पालिकेच्या कोड केअर सेंटरमधील आहे की खाजगी डॉक्टरांना पुरविण्यात येणाऱ्या इंजेक्शन मधील आहेत, याचा पोलीस शोध घेत आहेत. 

डॉक्टरांनी केला निषेधरविवारी पालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांबाबत निषेध व्यक्त करीत रुग्णालयाच्या गेटसमोर निदर्शने केली. रुग्णालयात दिवस-रात्र सेवा देणाऱ्या डॉक्टरांवर खोटे आरोप करून त्यांना बदनाम केले जात असल्याची खंत या डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसambernathअंबरनाथ