शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी दिव्यातून विशेष गाड्या सोडा; मनसेची मागणी

By मुरलीधर भवार | Updated: August 4, 2022 20:26 IST

मनसे आमदार राजू पाटील यांनी घेतली रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट

Ganeshotsav 2022 | कल्याण: कोकणातील गणेशोत्सवानिमित्त जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे.परंतु दिवा जंक्शन येथून कोकण वासियांसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.आमदार पाटील यांनी रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांची आज भेट घेतली असून दिव्यातील स्थानकावरील समस्या देखील त्यांच्या समोर मांडण्यात आल्या आहेत.

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चकरमान्यांची संख्या ही लक्षणीय आहे. वास्तविक रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी गोव्यापर्यत राहणारा मुंबईकर दिवा, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, नेवाळी, उल्हासनगर, बदलापूरसह अगदी कसारा, खोपोलीपर्यंत नोकरी निमित्त स्थायिक झाला आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात चाकरमानी आपल्या आपल्या कुंटुबासह मूळ गावी जाऊन गणेशोत्सव साजरा करत असतो. मात्र गणेशोत्सव तोंडावर आल्यावर दिवा जंक्शन वरून गाड्या सोडण्याबाबत रेल्वे प्रशासनाकडून घोषणा करण्यात येते. परंतु त्यावेळी प्रवाश्यांमध्ये गोंधळ उडून नियोजन करण्यात अडचणी येत असतात.त्यामुळे तातडीने रेल्वे प्रशासनाने घोषणा करावी जेणेकरून चाकरमान्यांना नियोजन करणे सोपे होईल अशी मागणी आमदार पाटील यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

आमदार पाटील यांच्या मागणीला रेल्वे प्रशासनाने देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.त्यामुळे आता रेल्वे अधिकारी यांची अधिकृत घोषणा कधी करणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आमदार राजू पाटील यांनी रेल्वेचे महाव्यस्थापक अनिल कुमार लाहोटी यांची भेट घेतल्यानंतर दिवा स्थानकातील समस्या त्यांच्या समोर मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने दिवा जंक्शन वरून गणपती स्पेशल ट्रेन सुरू करने, दिवा पनवेल -वसई रोड -पनवेल -रोहा रेल्वे मार्गावरील पॅसेंजरचे बंद केलेले रेल्वे थांबे सुरू करणे किंवा रेल्वे स्थानकावरील तिकीट घर शौचालय व शेड तातडीने कार्यान्वित करणे, लोकग्राम ब्रिज सद्यस्थिती, दिवा स्टेशन मास्तर हद्द विभाजन,दिवा रेल्वे स्टेशन परिसरात आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभारणे, दिवा रेल्वे स्थानकात रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करणे तसेच दिवा जंक्शन येथे हमाल यांची व्यवस्था करणे व आगासन व दातिवली रेल्वे फाटक रस्ता डांबरीकरणाबाबत चर्चा करण्यात आली आहे.

रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी देखील सकारात्मक प्रतिसाद या मागण्यांना दिला असून लवकरच सर्व समस्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन आमदार पाटील यांना दिले आहे.यावेळी मनसे रेल्वे सेनेचे अध्यक्ष .जितू पाटील, उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता महासंघ चे अध्यक्ष नंदकुमार देशमुख, मनसे जिल्हा संघटक हर्षद पाटील , दिवा मनसे अध्यक्ष तुषार पाटील आणि मनसेचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.

दिवा पूर्वेकडून पश्चिमेकडे ठाणे महानगरपालिकेकडून पाणी पुरवठा करण्यासाठी पुश थ्रू करण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. मात्र यावर अद्याप रेल्वे प्रशासनाने कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही. या बाबत रेल्वे विभागाने ठाणे मनपाला तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलMNSमनसेrailwayरेल्वेdivaदिवा