शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
4
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
5
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
6
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
7
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
8
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
9
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
10
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
11
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
12
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
13
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
14
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
15
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
16
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
17
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
18
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
19
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
20
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
Daily Top 2Weekly Top 5

कार्यालयीन वेळा बदलण्याचा प्रस्ताव बासनात गुंडाळला; १५ डब्यांच्या लोकल बदलापूरपर्यंत नेणे गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 10:23 IST

शटल सेवा वाढली नाही

डोंबिवली : दिवा-सीएसटी लोकल सुरू न करणे, १५ डब्यांच्या लोकल फेऱ्या न वाढल्याने प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढणे आणि ठाणे ते कर्जत-कसारा शटल सेवा न वाढवणे यामुळे मध्य रेल्वेवरील प्रवाशांची गर्दी व अपघात वाढले. रेल्वेची गर्दी कमी करण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळा बदलण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. मात्र तोही मागे पडला.

लष्कराच्या ऑर्डर्सना ‘स्वदेशी’ने उशीर; परदेशी कच्चा मालही लवकर मिळेना

डोंबिवलीत पलावा, कल्याण-शीळ रस्त्यावरील गृहसंकुल, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, आसनगाव पट्ट्यात झपाट्याने वाढते शहरीकरण याबाबत रेल्वे प्रशासन सहकार्य करत नसल्याने  समस्या वाढत आहेत. २०१२ मध्ये तत्कालीन खा. आनंद परांजपे यांनी मध्य रेल्वेने कल्याणपर्यंत येणाऱ्या १५ डबा लोकल या बदलापूर, आसनगावपर्यंत वाढवण्याची मागणी केली होती. तो प्रस्ताव रेल्वे बोर्ड, दिल्ली यांनी मंजूर केला होता, मात्र २०१४ नंतर केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार आल्यानंतर त्या विषयाला बगल दिली गेली. १५ डबा लोकलचा प्रस्ताव कागदावर राहिला. त्यामुळे दिवसेंदिवस ठाणे जिल्ह्यातील समस्या वाढत असल्याचे परांजपे म्हणाले.

माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कार्यालयीन कामाच्या वेळा बदलणे, कार्यालये स्थलांतर करणे असा प्रस्ताव दिला होता. सरकारी कार्यालयातील ज्या खात्यांचा थेट लोकांशी संबंध नाही अशी खाती उशिरा सुरु करून रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवा व जी खाती, विभाग जनतेशी संबंधित आहेत त्यांची कामे सकाळी सुरु करावीत, असा प्रस्ताव होता. तो प्रस्ताव सरकारी व खासगी आस्थापनांनी स्वीकारला असता तर गर्दीचे नियोजन करता आले असते.

मुरबाड, कर्जत पट्ट्यात भरपूर जागा आहे. त्याचा विचार करण्याबाबत पर्याय प्रवासी संघटनांनी सुचवले होते. ते सगळे बासनात गुंडाळले गेले.