शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

लोक संस्कृतीचे जतन करणे ही काळाची गरज, डॉ. अरुणा ढेरे यांचे प्रतिपादन

By मुरलीधर भवार | Updated: January 8, 2024 14:22 IST

कल्याण मुरबाड रोडवरील गोवेली येथे ग्रामदेवता आणि स्थानीय देवता सांस्कृतिक परंपरा या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. 

कल्याण-लोक संस्कृतीचे जतन करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन डॉ. रा.चि. ढेरे संस्कृती संशोधन केंद्राच्या अध्यक्षा आणि ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे यांनी येथे केले. कल्याण मुरबाड रोडवरील गोवेली येथील जीवनदीप शैक्षणिक संस्था संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणिअश्वमेध प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामदेवता आणि स्थानीय देवता सांस्कृतिक परंपरा या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख वक्त्या डॉ. प्राची मोघे, डॉ .विजय कुलकर्णी आणि जीवनदीप संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे इतिहास संशोधक अविनाश हरड यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के बी कोरे उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत घोडविंदे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ.विजय कुलकर्णी यांनी केले. त्यानी ग्रामदेवतेची सविस्तर माहिती सांगितली. त्यात त्यांनी ग्रामदेवतांची नावे कशी पडली. हे स्पष्ट केले. घोडविंदे यांनी इतिहास परिषद घेण्यामागचा हेतू स्पष्ट करताना जागृत देवता अजून भूतलावर आहे परंतु त्या गोष्टीचा गैरफायदा घेऊन अंधश्रद्धा पसरवून अनेक वेळेस लोकांना फसवले जाते असे होऊ नये. यासाठी आपल्याला आपल्या देवी देवतांचा इतिहास माहीत असणे आवश्यक आहे.

डॉ. ढेरे यांनी देवी देवतां विषयी संशोधन नातील अनुभव सांगितले. देवी देवतांशी संबंधित कथा सांगितली. लोक साहित्याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे लोक परंपरांचा जन्म आदीम काळापासून सुरू आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे यांनी केले. त्यानंतर २५ शोध निबंध दोन सत्रात सादर सादर केले. प्रथम सत्राचे अध्यक्ष डॉ. शामराव वाघमारे हे होते तर द्वितीय सत्राचे अध्यक्ष डॉ. कुलकर्णी हे होते. या वेळी पुरातन वस्तूंचे व पुस्तकांचे कला दालन उभारण्यात आले होते. याला सहभागी संशोधकांनी आणि मान्यवरांनी भेट दिली. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी प्रमुख वक्त्या डॉ मोघे यांनी मार्गदर्शन केले. उपस्थित संशोधकानीं आपले परिषदे विषयी अनुभव मांडले.

या एक दिवसीय राष्ट्रीय इतिहास परिषदेच्या निमित्ताने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यात रिल्स मेकिंग या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रणाली पष्टे आणि अंकिता हरड, द्वितीय क्रमांक मानसी धनगर आणि धनाजी चहाड ,तृतीय क्रमांक पूर्वा कराळे आणि इनाया पटेल ,पोस्टर मेकिंग या स्पर्धेत प्रथम पूर्वी शिरसागर ,द्वितीय क्रमांक कल्पेश शिंगवा, तृतीय क्रमांक मयुरी गायकर तसेच फोटोग्राफी या स्पर्धेत प्रथम क्रमांक यश गायकवाड द्वितीय क्रमांक सेजल पाटील, तृतीय क्रमांक विशाखा तरे यांनी पटकाविला. 

टॅग्स :kalyanकल्याण