शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

महिलांनी बुजवले ठाकुर्ली उड्डाणपुलावरील खड्डे; भाजप महिला आघाडीचे खड्डेभरो आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 16:50 IST

कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिक्षेत्रात रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांचा अपघात होईल का? अशी भीती व्यक्त केली आहे.

 डोंबिवली: कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिक्षेत्रात रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांचा अपघात होईल का? अशी भीती व्यक्त केली आहे. डोंबिवली पूर्व-पश्चिम शहराला जोडणार्या सध्याच्या एकमेव ठाकुर्ली उड्डाण पुलावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपा डोंबिवली पूर्व मंडळ महिला मोर्चा अध्यक्षा पूनम पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्या उड्डाणपुलावर मंगळवारी खड्डेभरो आंदोलन करून प्रशासनाचा निषेध करून लक्ष वेधले.त्या आंदोलनात माजी नगरसेविका खुशबू चौधरी, अमृता जोशी, मनीषा छल्लारे, वर्षा परमार, हेमलता संत, चित्रा माने, सायली सावंत, धरती गडा, वंदना आठवले आदी महिल सहभागी झाल्या होत्या. या आंदोलनात भाजपा महिलांनी रस्तावर पडलेल्या खड्ड्यात माती-विटांची भरणी करून ते खड्डे बुजविले.महिलांनी स्वतः भरलेली मातीची घमेली-फावडे घेऊन खड्डे भरले. सामान्य नागरिकांना खड्ड्यांमुळे त्रास होऊ नये ही भूमिका या आंदोलनामागे होती.यावेळी पुनम पाटील म्हणाल्या, शहरभर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे.पालिका प्रशासन झोपी गेले असून त्यांना रस्त्यांकडे बघायला वेळ नाही.

रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यासाठी निधी मंजूर झाला होता त्याचे पुढे काय झाले. रस्त्यांची दुरवस्था का होते याची माहिती पालकमंत्र्यांनी घेतली पाहिजे. खड्डेमय रस्त्यांमुळे अपघात होऊन नागरिक जखमी होत आहेत.रस्त्यातील खड्ड्यांमुळे वाहतूक विस्कळीत होऊन वाहतूक कोंडी होत आहे. आयुक्तांनी याची दखल घेऊन खड्डेमुक्त रस्ते करावे. फक्त सणवार आले की रस्त्यांची डागडुजी करून रस्त्याला मलमपट्टी लावू नये टीका केली.तर ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या वंदना आठवले म्हणल्या, या खड्ड्यांमध्ये पडून वाहनचालक जखमी झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी प्रशासनाने घ्यावी असे यावेळी सांगितले.विशेष म्हणजे कधी नव्हे ते वाहतूक पोलीस आंदोलनाच्या वेळी वाहतूक कोंडी होऊ नये आले होते.तर सामान्य नागरिकांनी भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला आमचा पांठिबा असून या पुलावरील खड्डे कधी बुजतील असा प्रश्न उपस्थित केला. 

टॅग्स :kalyanकल्याणBJPभाजपा