शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

"नरेंद्र मोदी यांचे देशांतर्गत धोरण शेतकरी आणि गरीब विरोधी; हिटलर मेल्याची वार्ता मला खोटी वाटते"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2021 19:37 IST

पंतप्रधान मोदी यांचे परराष्ट्रीय धोरण चांगले असून त्यांनी चीन व  पाकिस्तान सारखे भारताचे शत्रू थोपवून धरले असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस (Dr Shripal Sabnis) यांनी आज येथे व्यक्त केले. 

कल्याण - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशांतर्गत धोरण शेतकरी आणि गरीब विरोधी आहे. त्यामुळे ते शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकले नाहीत. मात्र परराष्ट्रीय धोरण चांगले असून त्यांनी चीन व  पाकिस्तान सारखे भारताचे शत्रू थोपवून धरले असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस (Dr Shripal Sabnis) यांनी आज येथे व्यक्त केले. 

कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयात लेखक गंगाधर मेश्रम यांच्या ओठावरील हायकूंचा आस्वाद या पुस्तकाचे प्रकाश डॉ. सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी डॉ. सबनीस यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला असता त्यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. या कार्यक्रमास हायकूकार राजन पोळ, अजित महाडकर, मोसिन मिरसिंगे, सलिम मिरसिंगे आणि भिकू बारस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डॉ. सबनीस यांनी सांगितले की, हिटलर मेल्याची वार्ता मला खोटी वाटते. कारण अमेरिका, रशिया आणि चीन हे तीन अणूअस्त्रधारी देशा साम्राज्यवादाची लढाई करीत आहे. त्यामुळे जगातील स्वातंत्र्य आणि शांतता धोक्यात आाली आहे. हे तिन्ही देश हिटलरच्या रुपाने जिवंत आहेत. 

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तुरुगांतून सुटण्यासाठी दया याचिका पत्र लिहिले होते. हा विषय सध्या चर्चिला जात आहे. याविषयी डॉ. सबनीस यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, महात्मा गांधी यांनी सावरकरांच्या देशभक्तीचा गौरव केला होता. सशस्त्र क्रांती सोडून अहिंसेचा मार्ग धरा असेही सांगितले होते. मात्र सावरकरांच्या हिंदूत्ववादी भूमिकेचे गांधींजीनी समर्थन केलेले नव्हते. महापुरुषांची बदनामी करुन त्यांची राष्ट्रभक्ती ते ब्राह्मण होते म्हणून जानव्यात कुजवावी हे काही बरोबर नाही. त्याचे राजकारण्यांनी भांडवल करावे ही प्रवृती लोकशाहीला घातक आहे. स्वातंत्र्यात सगळ्यांचा सहभाग होता. सावरकरांनी पाच सहा वेळा ब्रिटींशांना पत्र लिहिले. त्यावेळी दया याचनेची पद्धत होती. मात्र त्यांना तुरुंगातून बाहेर येऊन ब्रिटीशांचा प्रतिवाद करायचा होता. या कारणावरुन देशभक्तांची बदनामी करु नये, याकडे डॉ. सबनीय यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीShripal Sabnisश्रीपाल सबनीस