शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत शिंदे अन् ठाकरेंचाही फोटो, शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेची सर्वत्र चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2022 15:38 IST

डोंबिवली मध्यवर्ती शाखेवरून शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात आज पुन्हा एकदा वाद झाला आहे

डोंबिवली - शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर आता हा वाद शाखा ताब्यात घेण्यावरुनही सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गट समर्थकांमधून विस्तव जात नसल्याचे दृश्य डोंबिवलीत गुरुवारी दिसून आले, बुधवारी दिवाळी होताच शिंदे गटाने येथील मध्यवर्ती शिवसेना शाखेचा सकाळीच ताबा घेतला. त्यामुळे अल्पवधीतच राजकीय वातावरण तंग झाल्याने शहरात या घटनेची प्रचंड चर्चा सुरू होती. आज पुन्हा एकदा हा वाद उफाळून आला. मात्र, आज डोंबिवलीतील या शाखेत शिवसेनेच्या सर्वच नेत्यांचे फोटो पाहायला मिळाले. त्यामध्ये, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचेही फोटो दिसून आले. 

डोंबिवली मध्यवर्ती शाखेवरून शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात आज पुन्हा एकदा वाद झाला आहे. साधारण अडीच महिन्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा फोटो उद्धव ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी काढला होता, त्यावरूनच ठिणगी पेटली होती. त्यानंतर शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी शाखेवर ताबा घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांचे फोटो लावले होते. मात्र वाढता तणाव पाहत पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना वेगवेगळे कार्यालय दिले होते. त्यानंतर हा वाद काही काळासाठी थांबला. पण, आज सकाळी हा वाद पुन्हा पेटला असून शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी कायदेशीर प्रक्रिया करत शाखेचा करारनामा आपल्या नावावरती असल्याचे सांगत आज या शाखेवरती ताबा घेतला. मात्र, ताबा घेतल्यानंतर ही उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आणि खासदार श्रीकांत शिंदे असतील यांचे  फोटो मध्यवर्ती शाखेवर  लावले असल्याचे  दिसून आल्याने राजकीय वर्तुळत पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.

दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी वाद रंगला

दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी ही राजकीय घडामोड अतिशय वेगाने झाली. मध्यवर्तीवर सकाळीच शिंदे गटाचे शहरप्रमुख राजेश मोरे, ज्येष्ठ माजी नगरसेवक रमेश म्हात्रे, दीपेश म्हात्रे, राजेश।कदम, विश्वनाथ राणे, महेश पाटील आदींसह अन्य कार्यकर्ते, पदाधिकारी आल्याने राजकीय घडामोड होणार हे स्पष्ट झाले होते, त्या पाठोपाठ शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या जिल्हा महिला संघटक कविता गावंड, शहरप्रमुख विवेक खामकर हे मध्यवर्ती शाखेत आले, शाखा ही शिवसेनेची असून तिला ताब्यात घेता येणार नाही असे गावंड यांनी सांगितले, तसेच खामकर यांनीही ठाकरेंनी जबाबदारी दिली असून ती पार पाडणे हे प्रमुख असल्याने जे काही विषय आहेत ते चर्चेने सोडवावे, दादागिरी भाईगिरी कोणी करू नये असे म्हणाले. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे