शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जयंती शिवरायांची, शिवसेना शहरप्रमुखांनी बॅनरवर छापला छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 07:36 IST

बाहेरच्या पक्षातून आलेल्या लोकांना शहरप्रमुख अशी महत्त्वाची पदे दिली की असा गोंधळ होतो; भाजप आमदाराचा टोला

डोंबिवली: शिवजयंतीनिमित्त शिवसेना मध्यवर्ती शहर शाखेतर्फे सोमवारी लावलेल्या काही होर्डिंग्जवर छत्रपती शिवाजी महाराजांऐवजी छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो छापल्याचे निदर्शनास येताच भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी शिवसेनेला लक्ष्य केले. बाहेरच्या पक्षातून आलेल्या लोकांना शहरप्रमुख अशी महत्त्वाची पदे दिली की असा गोंधळ होतो. त्यामुळे खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्याबाबत जरा लक्ष घालावे, असे आवाहन करून त्यांनी टीका केली. त्यावर मंगळवारी शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार चव्हाण यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. त्या बॅनरवर नजरचुकीने छत्रपती शिवाजी महाराजांऐवजी छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो लागला होता, ती वस्तुस्थिती असून त्याबद्दल आपण दिलगिरी व्यक्त करतो, असे सांगितले.चव्हाण यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. त्याबाबत दाखला देताना उल्हासनगरच्या एका कार्यक्रमात ते  स्वतः महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यावर पुष्पहार अर्पण करताना त्यांच्या खांद्यावर हात ठेवून उभे होते, त्याचा बहुधा त्यांना विसर पडला असावा, याचीही मोरे यांनी आठवण करून दिली.शहरप्रमुखपदी कोणाला बसवायचे हा शिवसेना पक्षाचा प्रश्न आहे. शिवसेनेने शिवजयंतीनिमित्त काढलेली न भूतो अशी मिरवणूक बघून त्यांच्या पायांखालची वाळू सरकली असावी. आमच्या रक्तात हिंदुत्व असून त्यांनी आम्हाला ते शिकवू नये, असेही ते म्हणाले. तसेच भाजपने कधी शिवजयंती साजरी केलेली आपण पाहिले नाही. बॅनर लावले नाही. त्यामुळे अशा पद्धतीने दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे. मोरे हे मूळचे शिवसैनिक नाहीतमोरे हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. त्या पक्षातून ते दत्तनगर भागातून महापालिका निवडणुकीत निवडूनही आले होते. त्यानंतर २००९ दरम्यान ते शिवसेनेत आले. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत मोरे दाम्पत्याने निवडणूक जिंकली. त्यानंतर ते महापालिका सभागृह नेते झाले.पाठोपाठ त्यांना पक्षाने शहरप्रमुख ही जबाबदारी दिली. मोरे हे मूळचे शिवसैनिक नसून ते बाहेरून आले आहेत, अशी टीका चव्हाण यांनी केली. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा