शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे गटाच्या बॅनरवर भाजपाच्या आमदारांचा फोटो; एका आमदारांसोबत भांडण तर दुसऱ्या आमदारांना शुभेच्छा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2023 19:51 IST

कल्याण डोंबिवली शहरात शिंदे गट आणि भाजपामध्ये राजकीय पिंगा सुरू आहे.

मयुरी चव्हाण  

कल्याण डोंबिवली शहरात शिंदे गट आणि भाजपामध्ये राजकीय पिंगा सुरू आहे. कल्याणात तर भाजपाचे आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गट शिवसेनेचे कल्याण पूर्वेचे शहराध्यक्ष महेश गायकवाड यांच्यात तर जोरदार राजकीय घमासान सुरू आहे. एकिकडे  हा वाद सुरू असताना दुसरीकडे  मात्र महेश गायकवाड यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा फोटो सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. एकीकडे एका भाजपा आमदारांशी काहीही सूर जुळत नसताना दुसरीकडे मात्र चव्हाण यांना थेट शुभेच्छा देत शिंदे गटाने युती पालन करत  गणपत गायकवाड यांना चेकमेट करण्याचा प्रयत्न केला आहे.

 बुधवारी आमदार रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस होता. यानिमित्ताने  डोंबिवली नजीक असलेल्या  काटई नाक्यावर एक बॅनर लावण्यात आला आहे. या बॅनरवर चव्हाण यांच्यासह मनसेचे आमदार राजू पाटील यांचाही फोटो आहे. त्यामुळे एकीकडे टीका करायची अन् दुसरीकडे शुभेच्छा द्यायच्या असच चित्र दिसून आलं. आता शिंदे गटाकडूनही विशेषतः कल्याण पूर्वेतून चव्हाण यांना शुभेच्छा देण्यात  आल्या आहेत. मात्र कल्याण पूर्वेत भाजपा आमदार आणि शिंदे गट यांच्यातील वाद चव्हाट्यावर आले आहेत. नुकतेच भाजपाच्या एका कार्यक्रमातही आमदार गायकवाड यांनी शिंदे गटाच्या गुंड पदाधिकाऱ्यांना पोलीस संरक्षण दिले जाते अस जाहीरपणे  विधान केले होते. या विधानावर शिंदे गटाकडूनही तिखट प्रतिक्रिया देण्यात आली..मात्र आता ही दरी वाढेल अस वाटत असताना आज दिलेल्या शुभेच्छांनी या  राजकाराण्यांच्या मनात आहे तरी काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.  

टॅग्स :kalyanकल्याणEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा