शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
निवडणुकीत अजितदादांना शह द्यायला पार्थ पवार प्रकरण मुख्यमंत्र्यांनी बाहेर काढले?; चर्चांना उधाण
5
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
6
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
7
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
8
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
9
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
10
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
11
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
12
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
13
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
14
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
15
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
16
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
17
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
18
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
20
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."

केडीएमटीच्या बसवर आसाराम बापूचा फोटो, सोशल मीडियावर तीव्र नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 20:18 IST

लोकमतने विचारणा करताच तासाभरात जाहिरात गायब 

कल्याणडोंबिवली महानगरपालिकेला अलीकडे एक ना अनेक पुरस्कार प्राप्त होत आहेत. ही आनंदाची बाब असली तरी पालिकेच्या परिवहनच्या बसवर लागलेल्या एका जाहिरातीने सर्वांचं लक्ष वेधलं असून काही नागरिकांनी सोशल मीडियावर याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येतेय. केडीएमटीच्या बसवर आसाराम बापू यांचा फोटो असलेली एक जाहिरात लागल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. या जाहिराती कंत्राटदार लावतो असं स्पष्टीकरण केडीएमसीनं दिलं आहे. मात्र लोकमतनं विचारणा केल्यावर अवघ्या तासाभरात ही जाहिरात गायब झाल्याचं निदर्शनास आलं. 

केडीएमटीची  MH 05 R 1231 या बसवर एक जाहिरात लावण्यात आली होती. 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. याच पार्श्वभूमीवर आई वडिलांचे पूजन करुन खऱ्या अर्थाने हा दिवस साजरा करावा असं यात लिहिण्यात आलंय. हा संदेश जरी योग्य असला तरी त्याबाजूला लावण्यात आलेला आसाराम बापूचा फोटो आणि अन्य गोष्टी पाहता मोठ्या प्रमाणात विसंगती आढळून येत असल्याचं बोललं जातं आहे. यापूर्वी जाहीर कार्यक्रमात आसाराम बापूनं अनेकदा 14 फेब्रुवारी हा दिवस मातृपितृ दिवस म्हणून साजरा करावा असा उपदेश आपल्या भक्तांना दिला होता. आता 14 फेब्रुवारी जवळ येऊ लागल्यानं आसाराम बापूच्या फोटोसह त्याने दिलेल्या संदेशाची जाहिरात केडीएमटीच्या बसवर झळकत आहे. ही जाहिरात सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. वेगवेगळ्या गुन्ह्यांचा ठपका ठेवत आसाराम बापूवर कोर्टानं आरोप निश्चित केले होते.  यासंदर्भात परिवहन व्यवस्थापक दीपक सावंत यांना विचारलं असता जाहिरातीसाठी वार्षिक कंत्राट ठेकेदाराला दिलं जातं. त्यांच्याकडूनच जाहिराती लावल्या जातात. यासंदर्भात माहिती घेऊन तपासली जाईल आणि मग निर्णय घेतला जाईल असं त्यांनी सांगितलं. तसेच बसच्या लोकेशनबाबत विचारणा केली असता एक तास थांबण्याचा सल्ला दिला. त्यानंतर गणेश घाट आगारात ही बस असल्याची माहिती देण्यात आली. आगारात जाऊन बसची पाहणी केली असता या बसवरील जाहिरात गायब झाल्याचं दिसून आलं. या बससह इतर बसवरील जाहिरातीही काढण्यात आल्या अशी माहिती एका कर्मचाऱ्यांनं नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. त्यामुळे आता एका तासात नेमकं काय घडलं असावं? हा चर्चेचाच विषय आहे.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीSocial Mediaसोशल मीडिया