शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
4
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
5
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
6
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
7
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
10
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
11
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
12
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
13
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
14
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
16
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
17
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
18
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
20
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 06:01 IST

गोंधळाचा फायदा घेऊन ओला, उबर सेवांनीही भाडे नाकारून व दामदुप्पट दर आकारून प्रवाशांना वेठीस धरले

लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: मुंबईमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाचा फटका ठाणे, दिवा, कल्याणरेल्वेस्थानकातील लाखो लोकल प्रवाशांना गुरुवारी सायंकाळी बसला. ठाण्यात गुरुवारी संध्याकाळी ६:३० नंतर लोकल वाहतूक ठप्प झाल्याने जवळपास सर्वच फलाटांवर व मुख्यत्वे कल्याणकडे जाणाऱ्या धीम्या व जलद मार्गावरील फलाट प्रवाशांच्या गर्दीने फुलून गेले होते.

ठाण्याहून मुंबईकडे जाणारी लोकल ऐनवेळी कर्जतच्या दिशेने सोडल्याने मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांनी फलाट क्र. तीनवर संताप व्यक्त केला. त्यामुळे काही वेळ वातावरण तणावाचे बनले होते; पण त्या विरोधानंतरही लोकल कर्जतच्या दिशेने सोडण्यात आली. त्यामुळे ठाण्यात तासभर अडकून पडलेल्या शेकडो प्रवाशांना दिलासा मिळाला. संध्याकाळी ७ नंतर रात्री उशिरापर्यंत ठाणे स्थानकात फलाट एक ते सहा आणि फलाट ९ व १० वर प्रवाशांची तोबा गर्दी झाली होती. पाय ठेवायलाही जागा नव्हती. लोकल गोंधळाचा फायदा घेऊन ओला, उबर सेवांनीही भाडे नाकारून व दामदुप्पट दर आकारून प्रवाशांना वेठीस धरले.

रिक्षाचालकांनीही मनमानी भाडे आकारण्यास सुरुवात केली. ठाण्यातील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी रेल्वेने विशेष लोकल गाड्या ठाणे ते कर्जत, कसारा मार्गावर सोडण्याचा निर्णय घेतला. कालांतराने मुंबईतून लोकल सेवा सुरू झाली. मात्र, ठाण्यात मुंबईकडून येणाऱ्या लोकल अर्धा ते पाऊण तास विलंबाने येत असल्याने त्या सर्व गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी झाली. प्रवाशांना उतरताना प्रचंड हाल झाले. गाडीत चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या प्रवाशांमध्ये वादविवाद, हाणामारी असे प्रसंग वरचेवर घडत होते. दिवा आणि कल्याणमध्ये अशीच भीषण परिस्थिती पाहायला मिळाली.

काही प्रवासी फलाटावरच कोसळले

  • लोहमार्ग पोलिस, रेल्वे पोलिस परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत होते. प्रवाशांचा लोंढा संध्याकाळी ७ ते ८:३० या वेळेत प्रचंड असल्याने जो तो येणाऱ्या लोकलमध्ये कसे चढता येईल यासाठी जिवाची पर्वा न करता गर्दीत स्वतःला झोकून देत होता.
  • त्यात अनेकांच्या पर्स, बॅगांचे नुकसान झाले. काही प्रवासी गर्दीमुळे फलाटावरच कोसळले. दरम्यान, महिला प्रवाशांचे गर्दीमुळे प्रचंड हाल झाले.
English
हिंदी सारांश
Web Title : Chaos in Thane, Diva, Kalyan as Locals Diverted to Karjat

Web Summary : Train staff protests paralyzed Thane, Diva, and Kalyan stations. Local trains diverted to Karjat caused overcrowding, delays, and passenger fury. Commuters faced inflated fares and dangerous conditions.
टॅग्स :thaneठाणेdivaदिवाkalyanकल्याणKarjatकर्जतrailwayरेल्वेTrain Accidentरेल्वे अपघात