शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्याच्या झटापटीत प्रवासी जखमी, कल्याण रेल्वे स्थानकातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 23:13 IST

एक प्रवासी रेल्वेच्या दारात उभा होता. रेल्वे गाडी कल्याण रेल्वे स्थानकात आली असता गाडी थांबली असताना चोरट्याने प्रवाशाच्या खिशातून  मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला.

कल्याण - कळवा रेल्वे स्थानकात चोरट्याशी झालेल्या झटापटीत डोंबिवलीतील विद्या पाटील या प्रवासी महिलेचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना कल्याणरेल्वे स्थानकात चोरट्याशी झालेल्या झटापटीत प्रवासी जखमी झाला आहे. या घटनेचा प्रत्यक्षदर्शी प्रवाशांने अन्य प्रवाशांच्या मदतीने जखमी प्रवाशाला टिटवाळा रेल्वे स्थानकात उपचारासाठी नेले असता त्याठिकाणी प्रथमोपचाराची सुविधा नसल्याने प्रवासी संतप्त झाले. या घटनेचा व्हीडीओ प्रवाशांनी सोशल मिडियावर टाकला आहे.

एक प्रवासी रेल्वेच्या दारात उभा होता. रेल्वे गाडी कल्याण रेल्वे स्थानकात आली असता गाडी थांबली असताना चोरट्याने प्रवाशाच्या खिशातून  मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. प्रवाशाने खिसा घट्ट धरुन ठेवला. गाडी चालू होताच पळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी प्रवाशाने त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता चोरट्याने प्रवाशांच्या नाकावर जोरदार प्रहार केला. चोरट्याने हल्ला करुन पळ काढला. या हल्ल्यात प्रवासी रक्तबंबाळ झाला. जखमी प्रवाशाला इतर प्रवाशांनी टिटवाळा रेल्वे स्थानकात प्रथमोपचारासाठी नेले असता त्याठिकाणी प्रथमोपचाराची काही व्यवस्था नसल्याने प्रवासी संतप्त झाले. या घटनेचा व्हीडीओही प्रवाशांनी तयार करुन तो सोशल मिडियावर टाकला आहे. रेल्वे स्थानकात साधी प्रथमोपचाराची सुविधा नाही. प्रवाशावर झालेला हल्ला आणि प्रथमोपचाराची सुविधा नसणो यावरुन रेल्वेला प्रवाशांच्या जिविताचे काही एक गांभीर्य नाही. तसेच प्रवाशांची जिवित सुरक्षितता वाऱ्यावर असल्याचे या घटनेमुळे पुन्हा एकदा उघड झाले आहे. या घटनेला कल्याण रेल्वे पोलिसांनी दुजोरा दिला आहे. या घटनेचा तपास सुरु आहे.

टॅग्स :kalyanकल्याणrailwayरेल्वेThiefचोर