शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

भाजप-शिंदेसेना युती झाल्यास एकतर्फी सामना; उद्धवसेना-मनसेपुढे उमेदवार शोधण्याचे मोठे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 10:41 IST

शिंदेसेनेतील माजी नगरसेवकांना भाजपने प्रवेश दिल्याने उ‌द्भवलेला वाद केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापुढे गेला.

मुरलीधर भवार लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत मागील आठवड्यापर्यंत शिंदेसेना विरुद्ध भाजप संघर्ष होण्याची चिन्हे दिसत होती. शिंदेसेनेतील माजी नगरसेवकांना भाजपने प्रवेश दिल्याने उ‌द्भवलेला वाद केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापुढे गेला. त्यानंतर दिल्लीतून युतीचे फर्मान आल्याने या निवडणुकीत शिंदेसेना व भाजप यांची युती झाली, तर ही निवडणूक बऱ्याच प्रमाणात एकतर्फी होण्याचे संकेत आहेत. उद्धवसेना, मनसेतील उरलेसुरले माजी नगरसेवक, पदाधिकारी भाजप किंवा शिंदेसेनेत उड्या घेण्याची दाट शक्यता आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेत मागील वेळी शिवसेना हाच मोठा पक्ष होता. शिवसेना व भाजप स्वतंत्र लढले होते. या निवडणुकीत भाजपची ताकद वाढली. २०१० च्या निवडणुकीत मनसेने केडीएमसीत बाळसे धरले होते. मात्र, २०१५ च्या निवडणुकीत मनसे कल्याण-डोंबिवली रोडावली व भाजप वाढली. कल्याण-डोंबिवलीत सत्तेकरिता शिवसेना-भाजपने युती केली. रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यावर महापालिकेत भाजपचा महापौर बसवण्याकरिता त्यांनी शिंदेसेनेचे माजी नगरसेवक फोडले. यातून युतीत ठिणगी पडली. आता युती झाल्यास शिंदेसेना व भाजपसमोर जागावाटप हेच आव्हान राहील. महायुतीतील अजित पवारांची राष्ट्रवादी काय करणार, हे स्पष्ट नाही. उद्धवसेना, मनसे यांच्यापुढे उमेदवार शोधण्यापासून त्यांना ताकद देण्याचे आव्हान आहे.

२०१५ चे पक्षीय बलाबल - १२२ नगरसेवक

शिवसेना - ५३भाजप - ४३काँग्रेस - ४राष्ट्रवादी - २मनसे - ९बसपा - १एमआयएम - १अपक्ष - ९

सध्या कोणत्या राजकीय पक्षाकडे किती माजी नगरसेवक ?

भाजप - ५२शिंदेसेना - ५७उद्धवसेना - ३राष्ट्रवादी शप गट - ०राष्ट्रवादी अप गट - २मनसे - ३काँग्रेस - १

प्रथमच पॅनल पद्धत

केडीएमसीत यंदा पहिल्यांदाच पॅनल पद्धतीने निवडणूक होत आहे. २०१५ च्या निवडणुकीनुसार १२२ नगरसेवकांची संख्या आहे. त्यानुसार ३१ पॅनल तयार करण्यात आले. ३१ पैकी २९ पॅनल हे चार सदस्यीय आहे, तर २ पॅनल हे ३ सदस्यांचे आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP-Shinde Sena alliance: One-sided contest; Uddhav Sena, MNS face candidate challenge.

Web Summary : BJP-Shinde Sena alliance in Kalyan-Dombivli may lead to an easy win. Uddhav Sena and MNS struggle to find strong candidates. Seat sharing is the main challenge. The KDMC election will be held for the first time with the panel system.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूकkalyanकल्याण