शहरं
Join us  
Trending Stories
1
"सकाळी उठा, व्होटर डेलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
2
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
3
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
4
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
5
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
6
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
7
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
8
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
9
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
10
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
11
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
12
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
13
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
14
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
15
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
16
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
17
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
18
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
19
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
20
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल

राजकीय नेत्यांच्या भेटीने अडथळा, यंत्रणेवर माेठा ताण; नातलगांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 11:57 IST

सेंच्युरी रेयॉन कंपनीत स्फोट : गर्दीने रुग्णालय यंत्रणेवर माेठा ताण

राजेश जाधव

म्हारळ : सेंच्युरी रेयॉन कंपनीत शनिवारी सकाळी टँकरमधील रसायनाचा स्फोट होऊन भीषण अपघात घडल्यानंतर जखमींना उपचारांकरिता सेंच्युरी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बराच वेळ रुग्णांच्या नातलगांना प्रशासनाकडून माहिती दिली जात नसल्याने व राजकीय नेत्यांनी रुग्णांची विचारपूस करण्याकरिता गर्दी केल्याने नातलगांनी तीव्र संताप व्यक्त केला. 

स्फोटात मरण पावलेला शैलेश यादव हा उत्तर प्रदेशातील आझमगड येथील रहिवासी असून, कंपनीत हेल्परचे काम करीत होता. जखमी झालेल्यांमधील सागर झाल्टे (वय ४४) वाहन चालक पंडित मोरे (४३) हंसराज सरोज (५२) मदतनीस आणि प्रकाश आनंद निकम (३४) या चौघांवर उपचार सुरू असून, अमित भरूनिते याच्यावर कल्याण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती उल्हासनगर महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे यशवंत सगळे यांनी दिली.

सहायक पोलिस आयुक्त अमोल कोळी यांनी घटनास्थळी पोहोचून त्वरित परिस्थिती हाताळली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप फुल पगारे यांनी सांगितले की, सकाळी टँकरमध्ये रसायन भरण्यासाठी टँकरची तपासणी सुरू असताना टँकरचा स्फोट झाला. मात्र, कंपनीने रसायन भरण्याच्या प्रक्रियेला दुजोरा दिलेला नाही. अपघातात शैलेश यादव आणि अन्य एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला. वाशिम भातसई येथील कामगार अनंता जाधव ऊर्फ डोंगरे हा बेपत्ता आहेत, असे भाऊ बाळकृष्ण जाधव यांनी सांगितले. जखमी व मृतांच्या नातलगांनी कंपनीत प्रवेश मिळत नाही हे दिसल्यावर रुग्णालय गाठले. आपल्या माणसाला जो तो शोधत होता. त्यामुळे नातलगांना आवरताना रुग्णालय कर्मचाऱ्यांची धांदल उडाली. घटनेच्या तीन तासांनंतर काही माहिती मिळत नसल्याची तक्रार रुग्णालयात भेट देण्यात आलेले आमदार रोहित पवार यांच्याकडे नातलगांनी केली. 

जखमींचे नातलग नाराजरुग्णालयात स्थानिक लोकप्रतिनिधींनी धाव घेतल्याने रुग्णांवर उपचार करायचे की, राजकीय नेत्यांना माहिती द्यायची, या पेचात सेंच्युरी रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी सापडले होते. जखमींना उपचार मिळण्यात राजकीय नेत्यांच्या भेटीगाठीमुळे खंड पडतोय हे पाहून जखमींचे नातलग नाराज झाले होते.

नोकरी व आर्थिक मदतस्फोटात मरण पावलेल्या कामगारांच्या कुटुंबाला आर्थिक मदत व एकाला नोकरी देण्याचा निर्णय  कंपनी व्यवस्थापनाने घेतल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी मेहुल ललका यांनी दिली. स्फोटात शैलेश यादव व राजेश श्रीवास्तव या कामगारांचा मृत्यू झाला. एक जण बेपत्ता आहे.

लेखी आश्वासनाखेरीज शव स्वीकारण्यास नकारस्फोटात बेपत्ता असलेल्या अनंता जाधव यांच्या नातेवाइकांनी कंपनीने मदतीचे लिखित आश्वासन दिल्याशिवाय आम्ही शव स्वीकारणार नसल्याचा इशारा दिल्याने काही काळ गोंधळ उडला होता.

 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाulhasnagarउल्हासनगरBlastस्फोट