शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

NMMT बसला कल्याण-शीळ रोडवर आग; बॅटरीने घेतला पेट, जीवितहानी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 21:35 IST

नवी मुंबई महापालिकेच्या बसला रविवारी दुपारी भीषण आग लागल्याची घटना मानपाडा परिसरात घडली.

लोकमत न्यूज नेटवर्क 

डोंबिवली : नवी मुंबई महापालिकेच्या बसला रविवारी दुपारी १२.४५ सुमारास भीषण आग लागल्याची घटना मानपाडा परिसरात घडली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. बस दुरुस्त करत असताना बॅटरीने पेट घेतल्याने बसला आग लागल्याचे बोलले जातेय.

रविवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानक परिसरातून एनएमटीची बस प्रवाश्यांना घेऊन घणसोलीकडे रवाना झाली होती. मात्र कल्याण  शिळ रोड वरील मानपाडा बस स्थानकाजवळ बस आल्या नंतर बसचे ब्रेक डाऊन झाल्याचं समजताच वाहनचालक आणि वाहक  यांनी प्रवाशांना वाहनामधून उतरवून बस रिकामी केली होती. त्यानंतर वाहतूक कोंडी होत असल्याने बस ढकलत ढकलत मानपाडा बस स्टॉपच्या पुढे नेण्यात आली होती. यानंतर  दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास बस दुरुस्त करत असतानाच बॅटरीने पेट घेतला आणि क्षणातच आग वाढू लागली.  या आगीत बस जळून खाक झाली असून परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण झाले होते.दरम्यान  वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहनचालकांना रस्त्यावरील वाट मोकळी करून दिली आहे.तर दुसरीकडे अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात बसचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीAccidentअपघात