शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

साडेनऊ हजार रुग्ण होम आयसोलेटेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 12:00 AM

महिनाभरात घरातच तीन जणांचा मृत्यू : डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच सुरू आहेत उपचार

मुरलीधर भवारलोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सरासरी एक हजारापेक्षा जास्त कोरोना रुग्ण नव्याने आढळून येत आहेत. महापालिकेची सहा कोविड सेंटर आणि खाजगी ६८ कोविड रुग्णालये पाहता उपलब्ध बेड आणि आढळून येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण व्यस्त आहे. त्याचबरोबर ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड खाजगी आणि महापालिकेच्या रुग्णालयात उपलब्ध नसल्याने अनेक रुग्ण हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार होम आयसोलेशनद्वारे घरीच राहून उपचार घेत आहेत. मात्र, ज्या रुग्णांच्या घरी तशी सोय नाही त्यांच्या नातेवाइकांना उपचारासाठी वणवण करावी लागत आहे. काही रुग्णांना बेड उपलब्ध होत नाही. बेड उपलब्ध झाला तर त्याला आवश्यक असलेला ऑक्सिजन मिळत नाही. कुठे व्हेंटिलेटर नाही. बेड मिळाला तर इंजेक्शन मिळत नाही. इंजेक्शनचा साठा नियंत्रित करूनही उपलब्ध नाही. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी महापालिकेने क्वारंटाइन सेंटर उभी केली होती. एका रुग्णामागे २० जणांना ट्रेसिंग करून त्यांना होम क्वारंटाइन करण्यास सांगितले जाते. होम क्वारंटाइनची आताची संख्या ५ लाख ९ हजार ४१३ आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बाधितांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे.

होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणारे रुग्णखाजगी व सरकारी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या पाहता निम्म्यापेक्षा जास्त रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ९ हजार ५५२ आहे.कारणे काय ?महापालिका हद्दीत रुग्णांना बेड मिळत नाही, इंजेक्शन मिळत नाही, त्यामुळे अनेक जण त्यातही कोरोनाची सौम्य लक्षणे असलेले रुग्ण घरीच राहून उपचार घेत आहेत. काहींच्या घरी होम आयसोलेशनची सुविधा आहे. काही रुग्ण वृद्ध आहेत, त्यांच्या घरी धावपळ करणारे कोणी नाही. काहींची मुले लहान आहेत. काहींची घरे मोठी आहेत. त्यांच्या घरी स्वतंत्र खोली आहे. त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच होम आयसोलेशनचा पर्याय निवडला आहे. घरी त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांच्या तब्येतीची काळजी पालिकेकडून सतत घेतली जात आहे.

घरातील मृत्यूची टक्केवारी नगण्यकल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत होम आयसोलेशनमध्ये राहून घरीच उपचार घेतले जात आहेत. गेल्या महिनाभरात घरी उपचार घेणाऱ्या तीन रुग्णांचा मृत्यू झाला. होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणाऱ्यांची एकूण संख्या पाहता घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण नगण्य आहे.

होम आयसोलेशनसाठी रुग्णाला सक्ती केली जात नाही. त्याच्या घरी तशी सुविधा उपलब्ध असल्यास त्याला होम आयसोलेशनचा सल्ला दिला जातो. महापालिकेच्या कॉल सेंटरवरून रुग्णांच्या तब्येतीची विचारपूस केली जाते. होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे.- डॉ. प्रतिभा पानपाटील, वैद्यकीय अधिकारी. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या