शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

Nawab Malik: नवाब मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी डोंबिवलीत भाजपची निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 12:36 IST

नवाब मालिकांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याच्या मागणीसाठी आज भाजपतर्फे सर्वत्र आंदोलन करण्यात येत आहे.

डोंबिवली - राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीनं अटकेची कारवाई केली आहे. त्यानंतर आता मलिकांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा यासाठी डोंबिवलीत भाजपतर्फे निदर्शने करण्यात आली. डोंबिवली पूर्वेतील इंदिरा चौकात झालेल्या या निदर्शनांमध्ये नवाब मलिक आणि राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. 

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांना काल अनेक तासांच्या चौकशीनंतर ईडीकडून अटक करण्यात आली. ही कारवाई सूडबुद्धीने केल्याचे आणि राज्य सरकार पाडण्याच्या उद्देशाने झाल्याचे सांगत राष्ट्रवादीतर्फे बुधवारपासून राज्यभरात आंदोलन सुरू आहेत. त्याचा निषेध करण्यासह नवाब मालिकांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याच्या मागणीसाठी आज भाजपतर्फे सर्वत्र आंदोलन करण्यात येत आहे. नवाब मलिक यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता, दाऊदशी हितसंबंध, आर्थिक हितसंबंध अशा सर्व गोष्टी तपासल्यावरच ईडीने मलिक यांना अटक केल्याची माहिती भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी सांगितले. त्यामुळे नैतिकतेच्या आधारावर नवाब मलिक यांनी लवकरात लवकर राजीनामा देण्याची आग्रही मागणी भाजपतर्फे निदर्शनांदरम्यान करण्यात आली.

यावेळी झालेल्या आंदोलनात माजी नगरसेवक विशु पेडणेकर, निलेश शिंदे, समीर चिटणीस, भाजप युवा मोर्चाचे मितेश पेणकर यांच्यासह अनेक पदाधिकारी, महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :nawab malikनवाब मलिकBJPभाजपा