स्वयंसेवक निवडून महापालिका तयार करणार स्वत:चा डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 07:55 PM2021-07-26T19:55:04+5:302021-07-26T19:55:31+5:30

KDMC : गेल्या आठवड्यात महापालिका क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या एकंदर परिस्थितीचा आढावा घेतांना आजच्या आढावा बैठकीत आयुक्तांनी उपस्थित सर्व विभागीय उपआयुक्त व सर्व प्रभागक्षेत्र अधिकारी, इतर अधिकारी यांच्याशी संवाद साधतांना या सूचना दिल्या. 

Municipal Corporation will form its own Disaster Response Force by selecting volunteers! | स्वयंसेवक निवडून महापालिका तयार करणार स्वत:चा डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स! 

स्वयंसेवक निवडून महापालिका तयार करणार स्वत:चा डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स! 

Next

कल्याण : अतिवृष्टीमध्ये तसेच आपत्कालिन परिस्थितीत नागरिकांना मदत करण्यासाठी महापालिकेचा स्वत:चा डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स तयार करावा, अशा सुचना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज दिल्या. गेल्या आठवड्यात महापालिका क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या एकंदर परिस्थितीचा आढावा घेतांना आजच्या आढावा बैठकीत आयुक्तांनी उपस्थित सर्व विभागीय उपआयुक्त व सर्व प्रभागक्षेत्र अधिकारी, इतर अधिकारी यांच्याशी संवाद साधतांना या सूचना दिल्या. 

पावसाचा जोर ओसरल्यानंतर पाणी साचलेल्या परिसरात साथरोगाची लागण होऊ नये म्हणून सगळीकडेच जंतूनाशक, दुर्गंधीनाशक फवारणीची काय स्थिती आहे, याचा आढावा आयुक्तांनी आज घेतला आणि जिथे - जिथे अतिवृष्टीमुळे अडचणी निर्माण होतात तिथे तिथे कायमस्वरूपी काय उपाययोजना करता येतील याबाबत प्रत्येक प्रभाग अधिका-याने अशा परिस्थितीत उद्भवलेल्या समस्या आणि त्यासाठी कायमस्वरूपी करावयाची उपाययोजना याबाबत अहवाल तयार करावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. 

छोट्या नाल्यांची सफाई नीट झाली नसल्यामुळे पाणी तुंबण्याच्या  घटना घडल्याचे दिसून आले, याकरीता छोटया नाल्यांची कटाक्षाने सफाई करावी. महापालिकेने आता स्वत:चा डिझास्टर फोर्स उभारावा, अशा सूचना आयुक्तांनी या बैठकीत दिल्या. प्रभागक्षेत्र अधिका-यांनी आपत्ती समयी धावून येणा-या स्वयंसेवकांना निवडून त्यांचा अंतर्भाव या फोर्समध्ये करुन त्यांना प्रशिक्षण द्यावे, आवश्यक असेल तेव्हा अतिरिक्त मनुष्यबळ आऊटसोर्सिंगद्वारे उपलब्ध करुन घ्यावे, अशाही सूचना या बैठकीत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिल्या.

Web Title: Municipal Corporation will form its own Disaster Response Force by selecting volunteers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.