शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

कल्याण-डोंबिवलीची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी खासदारांची घेतली एमएमआरडीएसोबत बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 20:13 IST

Shrikant Shinde News: कल्याण पूर्व पश्चिमेला जोडणारा  40 कोटी रुपये खर्चाचा एलीव्हेटेड पूल आणि नेवाळी नाक्यावरील उड्डाणपूल यांना गती देण्यासाठी कल्याणचे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे.

कल्याण- कल्याण डोंबिवली शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शहाड उड्डाणपूलाचे चौपरीकरण, कल्याण पूर्व पश्चिमेला जोडणारा  40 कोटी रुपये खर्चाचा एलीव्हेटेड पूल आणि नेवाळी नाक्यावरील उड्डाणपूल यांना गती देण्यासाठी कल्याणचे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यांनी आज एमएमआरडीए आयुक्तांसोबत मुंबई कार्यालयात एक बैठक घेतली. या बैठकीस कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह शिवसेनेचे माजी नगरसेवक विश्वनाथ राणो, दीपेश म्हात्रे आणि राजेश मोरे आदी उपस्थित होते. (MP Shrikant Shinde holds meeting with MMRDS to resolve Kalyan-Dombivali traffic congestion)

खासदार शिंदे यांनी सांगितले की, कल्याण मुरबाड नगर मार्गाचे चौपदरीकरण केले जाणार आहे. या मार्गावरील वालधूनी पूल चौपदरी झाला आहे. शहाड येथील रेल्वे उड्डाणपूल हा दुपरी आहे. या पूलाचे चौपदरीकरण करण्याची मागणी एमएमआरडीएकडे करण्यात आले. त्याचा डीपीआर तयार करण्याचे आदेश एमएमआरडीएने महापालिका आयुक्तांना दिले आहे. डीपीआर तयार झाल्यावर पूलाच्या बांधणीकरीता किती खर्च होईल हे स्पष्ट होणार आहे.

त्याचबरोबर कल्याण पूर्व पश्चिमेला जोडणारा एलीव्हेटेट 4क्क् कोटी रुपयांचा पूल तयार करण्यात येणार आहे. कल्याण पूना लिंक रस्त्यावरुन विठ्ठलवाडी येथून थेट हा पूल कल्याण पश्चिमेतील भवानी चौकात उतरणार आहे. त्याचा डीपीआर तयार आहे. त्याची रेल्वेकडून डीएडी मंजूरी आवश्यक आहे. हा पूल तयार झाल्यावर कल्याण पूर्व पश्चिम  गाठण्यासाठी होणा:या वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार आहे असे खासदार शिंदे यांनी सांगितले .

कल्याण मलंग रस्त्याचे रुंदीकरण झाले आहे. हा रस्ता अंबरनाथ शीळ रस्त्यास नेवाळी नाक्यावर मिळतो. नेवाळी नाक्यावरी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी त्याठिकाणी उड्डाणपूल तयार करण्याची मागणी खासदार शिंदे यांनी एमएमआरडीएच्या आयुक्तांकडे केली आहे. त्याचाही डीपीआर लवकर तयार केला जाणार आहे.

गेल्याच महिन्यात खासदार शिंदे यांनी कल्याण दुर्गाडी ते टिटवाळा रिंग रोड प्रकल्पाची पाहणी केली होती. हा रिंग रोड जिथे संपतो त्याठिकाणाहीन पुढे मुरबाड गोवेली नाक्यावर रस्ता नेण्याकरीता त्याचाही डीपीआर तयार करण्यात यावा. टप्पा क्रमांक आठ तयार केला जावा असे शिंदे यांनी सांगितले. याशिवाय मोठा गाव ठाकूर्ली ते दुर्गाडी हा रिंग रोडचा तिसरा टप्पा आहे. त्यासाठी 83 टक्के भूसंपादन करण्यात आले आहे. त्यामुळे तिस:या टप्प्याची निविदा काढावी अशी मागणी केली असता येत्या आठवडय़ात निविदा काढली जाईल असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. काटई ते मोठा गाव ठाकूर्ली हा रिंग रोडचा तिसरा टप्पा आहे. त्याच्या भूसंपादनाची प्रक्रिया कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांनी सुरु करावी असे एमएमआरडीेने सूचित केले आहे असे शिंदे यांनी सांगितले.

हे सगळे प्रकल्प सुरु होऊन मार्गी लागल्यास कल्याण डोंबिवली परिसरातील वाहतूक कोंडी सूटण्यास मदत होईल. पत्री पूल, वडवली पूल आणि दुर्गाडी खाडी पूलाचे काम झाले आहे. मोठा गाव ठाकूर्ली ते माणकोली खाडी पुलाचे काम प्रगती पथावर आहे. त्याच बरोबर रिंग रोड, शहाड उड्डाणपूल, कल्याणचा एलिव्हेटेट पूल आणि आणि नेवाळी उड्डाणपूल झाल्यास चहूबाजूंनी ठाणो, मुरबाड नगर, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई आणि अंबरनाथ बदलापूर शहरांशी कनेक्टीव्ही वाढणार असल्याचा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला आहे.  

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेkalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिका