शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

मलंगगडमुक्तीवरुन एकनाथ शिंदेंच्या विधानावरुन ओवैसी आक्रमक; वाद पुन्हा पेटण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 13:58 IST

मलंगगडावरून हिंदू आणि मुस्लिम समाजात गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहेत.

धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या मलंगगडमुक्तीच्या आंदोलनाचे आम्ही साक्षीदार असून श्री मलंगगडाबाबतची लोकभावना आमच्या लक्षात असून काही गोष्टी आपण जाहीरपणे सांगू शकत नाही. मात्र आपल्या सर्वांच्या मनात असणारी मलंगगडमुक्तीची भावना पूर्ण केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. श्री मलंगगडाच्या पायथ्याशी आयोजित राज्यस्तरीय श्री मलंगगड अखंड हरिनाम सप्ताह झाला. त्यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते.

एकनाथ शिंदेंच्या या विधानावर एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या संबंधित सर्व सरकार मंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असेही ओवैसी यांच्याकडून सांगण्यात आले आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच अशा प्रकारचे वक्तव्य करून जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करणे कितपत योग्य आहे, असा सवालही ओवैसी यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उघडपणे लोकांना गुन्हे करण्यास प्रवृत्त करत आहेत, असा आरोपही ओवैसी यांनी केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा वाद आता आणखी किती वाढतो, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. 

नेमका वाद काय?

मलंगगडावरून हिंदू आणि मुस्लिम समाजात गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहेत. दोन्ही धर्मांचे लोक या जागेवर दावा करतात. मलंगगडाच्या वादाच्या केंद्रस्थानी आहे, हाजी मलंग दर्गा. जो बाराव्या शतकात मध्यपूर्वेतून भारतात आलेला एक सूफी संत बाबा अब्दुर रहमान मलंग यांना समर्पित आहे. हा दर्गा तब्बल ३०० वर्षे जुना आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, मलंगगड मौर्य वंशाचा राजा नालेदेव याने सातव्या शतकात बांधला होता. हा किल्ला टेकडीच्या तीन छोट्या भागांवर बांधला गेला आहे आणि मुंबईच्या सीमेवर असलेल्या कल्याणमध्ये आहे. हिंदू समुदायाचा एक भाग याला मच्छिंद्रनाथ समाधी म्हणून ओळखतो. अनेक भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. श्री मलंगगड येथे ही समाधी नाथपंथातील संत मच्छिंद्रनाथांची असल्याचे गोरखनाथ पंथ मानणारे लोक सांगतात. तर दुसरीकडे तेराव्या शतकात येमेनहून आलेले सूफी संत सूफी फकीर हाजी अब्दुल रहमान शाह मलंग ऊर्फ ​​मलंग बाबा यांची ही कबर आहे. दोन्ही बाजूंनी जमिनीचा एक-एक भाग ताब्यात घेतला आहे. यावरून दोन्ही पक्षांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtraमहाराष्ट्रAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीNarendra Modiनरेंद्र मोदी