शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

डोंबिवली स्टेशनवर पाहता येणार चित्रपट; सिने डोम उभारण्याचा ‘मरे’चा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 06:53 IST

स्थानकातच प्रवाशांना विविध आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावर रेल्वे प्रशासनाने भर दिला आहे

मुंबई - मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने डोंबिवली, खोपोली, जुचंद्र आणि इगतपुरी स्थानकांवर प्री-फॅब्रिकेटेड सिने डोम उभारण्याचा निर्णय़ घेतला आहे. यासाठी  निविदा मागविण्यात आल्या आहेत. या सुविधेमुळे प्रवाशांना स्थानकात चित्रपट पाहता येणार आहे. 

स्थानकातच प्रवाशांना विविध आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावर रेल्वे प्रशासनाने भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्थानकात सिने डोम उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सिने डोम हा ग्राहक/अभ्यागत/पाहुण्यांसाठी जेवण/नाश्ता/पेय्यांसह नवीनतम चित्रपट प्रदर्शित आणि माहितीपट आणि इतर सामग्री इ.सह चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी एक संपूर्ण व्यवस्था असणार आहे. 

मात्र, कायमस्वरूपी बांधकाम करण्यास परवानगी दिली जाणार नाही. सिने डोमचे व्यवस्थापन निविदाकार स्वतःच ऑपरेटर करतील. गर्दीचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी परवानाधारकाची असणार आहे. दहा वर्षांच्या कालावधीसाठी डोंबिवली, खोपोली, जुचंद्र आणि इगतपुरी स्थानकांवर प्री-फॅब्रिकेटेड सिने डोम सेट अप आणि ऑपरेट करण्यासाठी ते नॉन-फेअर रेव्हेन्यू  उत्पन्न मॉडेल अंतर्गत असेल.स्थानकात पाच हजार चौरस फूट जागेत डोमची निर्मिती होणार आहे.  

प्रतिवर्षी राखीव किंमत डोंबिवली     : ४७,८५,४०० रु.जुचंद्र     : ३५,८२,००० रु. इगतपुरी     : १७,१०,४०० रु. खोपोली     : २३,३१,१०० रु. 

टॅग्स :railwayरेल्वे