शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मोरीवली एमआयडीसीतील रासायनिक कंपनीला आग, वायुगळतीने रहिवाशांना त्रास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 05:03 IST

ही आग आटोक्यात आणण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेचे अग्निशामक दल, एमआयडीसीचे अग्निशामक दल आणि उल्हासनगरचे अग्निशामक दल घटनास्थळी रवाना झाले होते.

अंबरनाथ : अंबरनाथच्या मोरीवली एमआयडीसी क्षेत्रात जैन ॲॅण्ड जैन या रासायनिक कंपनीला शुक्रवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या कंपनीत रसायनाचा मोठा साठा असल्याने परिसरातील गावांनादेखील धोका निर्माण झाला होता. मात्र, अग्निशामक दलाने आग वेळीच आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.सुरुवातीला या कंपनीतून वायूगळती सुरू झाली होती. वायूगळती होत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी अग्निशामक दलाला देताच अग्निशामक दल घटनास्थळी रवाना झाले होते. मात्र, अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचतात कंपनीतील रसायनाने पेट घेतल्याने कंपनीत भीषण आग लागली. यामुळे कंपनीतील ज्वलनशील रसायनांना मोठा धोका निर्माण झाला होता. अशा परिस्थितीतदेखील अग्निशामक दलाने ही आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले.

मोठी दुर्घटना टळली ही आग आटोक्यात आणण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेचे अग्निशामक दल, एमआयडीसीचे अग्निशामक दल आणि उल्हासनगरचे अग्निशामक दल घटनास्थळी रवाना झाले होते. या कंपनीच्या शेजारीच दोन मोठ्या रासायनिक कंपन्या असल्याने या कंपनीतील आग भडकली असती तर त्या दोन्ही कंपन्यांना मोठा धोका निर्माण झाला असता.

दीड तासानंतर आगीवर नियंत्रण तब्बल दीड तास त्यांचा प्रयत्न ही आग विझवण्यासाठी सुरू होता. मात्र आगीसोबत रसायनदेखील पेट घेत असल्याने परिसरात अनेक नागरिकांना श्वसनाचा त्रास सुरू झाला. घातक असे केमिकल हवेत आल्याने नागरिकांनी आपल्या घरातील दारे बंद करून घरात राहण्याचा निर्णय घेतला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातवरण पसरले आहे.  

टॅग्स :fireआगthaneठाणेMIDCएमआयडीसीkalyanकल्याण