शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

"फीमध्ये सवलत न दिल्यास २०० पालकांसह मनसे दाखवणार हिसका" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2020 06:46 IST

Dombivali : कोरोनामुळे नऊ महिन्यांपासून राज्यातील शाळा व कॉलेज बंद आहेत. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाने फीसंदर्भात विद्यार्थ्यांवर व पालकांवर दबाव आणू नये व फीमध्ये सवलत द्यावी, असे आदेश आहेत.

डोंबिवली :  कोरोना काळात शाळा व्यवस्थापनाने पालकांवर फी भरण्यासाठी सक्ती करू नये, तसेच फीमध्ये सवलत द्यावी, असे आदेश शासनाने देऊनही डोंबिवलीतील होली एंजल्स शाळेने फीसाठी पालकांना वेठीस धरले आहे. त्यामुळे २०० पालकांनी मनसेचे कल्याण ग्रामीण अध्यक्ष व माजी नगरसेवक मनोज घरत यांच्याकडे न्याय मिळावा, यासाठी मदत मागितली. त्यानुसार या बैठकीत शाळा व्यवस्थापनाविरुद्ध जानेवारीत मनसेच्या पद्धतीने शाळेला हिसका दाखविण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.कोरोनामुळे नऊ महिन्यांपासून राज्यातील शाळा व कॉलेज बंद आहेत. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाने फीसंदर्भात विद्यार्थ्यांवर व पालकांवर दबाव आणू नये व फीमध्ये सवलत द्यावी, असे आदेश आहेत. मात्र, होली एंजल्स शाळेने पालकांना पूर्ण फी भरण्यासाठी तगादा लावला आहे. त्यामुळे पालकांनी घरत यांची भेट घेत तोडगा काढण्यास विनंती केली. त्यानुसार घरत यांनी शाळा व्यवस्थापनाला फीमध्ये सवलत द्यावी अशी विनंती केली. मात्र, शाळेने मागणी मान्य न केल्याने पालकांत संतापाची भावना आहे. शाळा व्यवस्थापनाने महिनाअखेर फीमध्ये सवलत देण्याचा ठोस निर्णय न घेतल्यास जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मनसेच्या पद्धतीने हिसका दाखवला जाईल, असा इशारा घरत यांनी दिला आहे.दरम्यान, या शाळेत सुमारे पाचशेच्या आसपास विद्यार्थी आहेत. सध्या शाळा शिक्षकांनाही कमी पगार देत आहे. ऑनलाइन पद्धतीने शाळा सुरू आहे. ऑनलाइन प्रक्रियेत शाळेला खर्च कमी येत असून शाळेची मनमानी सुरू आहे. आम्ही ही मनमानी खपवून घेणार नाही. पालकांना न्याय मिळेपर्यंत मनसे पालकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी असल्याचे घरत यांनी पालकांना सांगितले.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीMNSमनसेEducationशिक्षण