शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

Raju Patil : "अनुराग ठाकूरजी, आमची KDMC फक्त सेटींगमध्ये स्मार्ट...; बरं झालं आपणच घरचा आहेर दिला"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 11:52 IST

MNS Raju Patil And Anurag Thakur : मनसेचे आमदार प्रमोद (राजू) रतन पाटील (MNS Raju Patil) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे.

केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) हे रविवारपासून तीन दिवस कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. ठाकूर यांनी कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात महापालिका आयुक्तांसह पालिका अधिकाऱ्यांची भेट घेत विकास कामांचा आढावा घेतला. तसेच त्यांनी स्मार्ट सिटी येथील कंट्रोल रूमला भेट दिली. याच दरम्यान त्यांनी रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत नाराजी व्यक्त करत आयुक्तांना खडे बोल सुनावले. यावरून आता मनसेने खोचक ट्विट करत निशाणा साधला आहे. KDMC फक्त सेटींगमध्ये स्मार्ट आहे असं म्हणत हल्लाबोल केला आहे. 

मनसेचे आमदार प्रमोद (राजू) रतन पाटील (MNS Raju Patil) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "हे शहर स्मार्ट सिटीमध्ये आहे का? हे ऐकून मी आश्चर्यचकीतच झालो, रस्ते पण खराब आहेत… केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे आयुक्तांना खडे बोल... अनुराग ठाकूरजी, आमची #KDMC फक्त सेटींगमध्ये स्मार्ट आहे. मग ती टक्केवारीची असो की नवनवीन पुरस्कार असो….बरं झाले आपणच घरचा आहेर दिला" असं राजू पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.  

कल्याणवर भाजपचा दावा नाही - ठाकूर

कल्याण लोकसभा मतदारसंघात आमच्या मित्रपक्षाचे खासदार डॉ. शिंदे कार्यरत आहेत. पक्ष संघटनेला बळकटी देण्याचे कार्य आम्ही करत आहोत, त्याचा एक भाग म्हणून हा दौरा आहे. या मतदारसंघावर दावा करण्याचा भाजपचा हेतू नाही, असे अनुराग ठाकूर यांनी स्पष्ट केले. शिंदे यांच्या निवासस्थानी ठाकूर यांनी मोदकाचा आस्वाद घेतला आणि ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणत प्रसाद मिळाल्याचे सांगितले. मोदक गोड होता, त्यात माध्यमांना वाटते म्हणून मसाला लावून त्याची गोडी का घालवायची, असे ते म्हणाले.

भाजपचा आढावा सुरू असला, तरी माझ्या कल्याण लोकसभा मतदारसंघाला कोणताही धोका नाही, असे वक्तव्य खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले. हा दौरा घोषित झाल्यापासून डॉ. शिंदे यांच्या उमेदवारीला धोका, कल्याण मतदारसंघावर भाजपचा दावा, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. त्या आता थांबवा, असेही ते म्हणाले. हा नियोजित दौरा होता. तो त्यांनी केला. सकारात्मक दृष्टीने त्या दौऱ्याकडे आम्ही पाहात असून, माध्यमांनी मसाला लावून बातम्या देणे थांबवावे, असे आवाहनही त्यांनी केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही आगामी काळात भाजप - शिवसेना यांच्यात युती होऊन निवडणुका लढवल्या जातील, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघातून पुन्हा मलाच उमेदवारी मिळेल आणि युतीच्या माध्यमातून आम्ही सगळे कार्यरत राहू, असेही डॉ. शिंदे म्हणाले. 

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलMNSमनसेkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाAnurag Thakurअनुराग ठाकुर