शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

"त्या" गावातील जमिनीच्या मोजणीला गावकऱ्यांसह मनसेचा विरोध, आमदार राजू पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 17:37 IST

Kalyan News: गिरणी कामगारांसाठी कल्याण ग्रामीण भागातील उत्तराशीव व हेदुटणे येथे घरांची निर्मिती करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. या संदर्भात जमिनीच्या मोजणीच्या हालचाली देखील झाल्या आहेत. मात्र या सुरु असलेल्या प्रकाराला मनसे आमदार राजू पाटील आणि स्थानिक भूमिपुत्रांनी विरोध केला आहे.

- मयुरी चव्हाण काकडे गिरणी कामगारांसाठी कल्याण ग्रामीण भागातील उत्तराशीव व हेदुटणे येथे घरांची निर्मिती करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. या संदर्भात जमिनीच्या मोजणीच्या हालचाली देखील झाल्या आहेत. मात्र या सुरु असलेल्या प्रकाराला मनसे आमदार राजू पाटील आणि स्थानिक भूमिपुत्रांनी विरोध केला आहे. गुरचरण जागेत गावकऱ्यांना रुग्णालये,क्रीडा संकुल,गार्डन उभारण्याची मागणी केलीय तसेच एकाच विभागात शासनाकडून नवनवीन प्रकल्प टाकण्याचा सपाटा सुरु केल्याने मनसे आमदार  पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली आहे.

हेदुटणे व उत्तरशीव येथे म्हाडाच्या माध्यमातून घरांची निर्मिती करण्याचा प्रयत्न शासनाने केला आहे. मात्र गुर चरण्यासाठी गावकऱ्यांनी अतिक्रमण न करता राखून ठेवलेली जमीन आता शासनाच्या नजरेत आल्याचा आरोप होत आहे. नुकतेच या संदर्भात तहसीलदारांना आदेश मिळाल्यानंतर तातडीने ताहिलदारांनी पोलीस फौज फाटा घेऊन गावांमध्ये जमिनीच्या मोजणीच्या कामाला सुरुवात करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कायदा व सुरव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी  राजू पाटील यांनी दूरध्वनीद्वारे ग्रामस्थ व तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला होता. जमीन मोजणीसाठी गेलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सोबतच्या संवादाच्या व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्या होत्या.त्यामुळे तातडीने  पाटील यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन भूमिपुत्रांना देऊन संयम बाळगण्याची विनंती केली होती. याआधी देखील कल्याण तालुक्यातील खोणी,शिरढोण व ठाणे तालुक्यातील भंडार्ली,गोठेघर येथे म्हाडाचे प्रकल्प सुरु आहेत. तसेच एमएमआरडीए व खासगी विकासकांकडून प्रकल्प सुरु आहेत. त्यांनाच पाणी,रस्ते, आरोग्य सेवा,गार्डन,खेळाची मैदान आरक्षित नाहीत. अशा वेळी एकाच परिसरात शासनाचे नवनवीन प्रकल्प टाकत असल्याने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आमदार पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सरकार काय भूमिका घेणार? कल्याण ग्रामीण भागात लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत चालली आहे. अशा वेळी शासकीय जागा या स्थानिकांसाठी रुग्णालये,खेळाची मैदान,यांसाठी आरक्षित करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. असे असतानाही गृहसंकुल प्रकल्पांसाठी जागा देण्यात प्रथम सोयी - सुविधांचा विचार करणे आवश्यक होते. मात्र कोणत्याही प्रकारचा विचार न करता सर्रास आरक्षण टाकण्याचा सुरु असलेल्या या कारभारावर पाटील यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांसह गृहनिर्माण मंत्री, जिल्हाधिकारी व म्हाडाचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे आता सरकारच्या पुढील भूमिकेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.  कामगारांच्या घरांना आमचा विरोध नाहीआमचा गिरणी कामगारांच्या घरांना कोणत्याही प्रकारचा विरोध नाही. तर ज्या ठिकाणी गिरणी होत्या त्याच ठिकाणी गिरणी कामगारांना घर मिळावीत अशी इच्छा त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली आहे. त्यामुळे आता सरकार या प्रश्नी काय निर्णय घेतंय हे पाहणे देखील महत्वाचं ठरणार आहे. - राजू पाटील, आमदार , कल्याण ग्रामीण

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलkalyanकल्याणMNSमनसे