शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा बांधकाम प्रकरणात कोट्यावधी रुपयांच्या गैरव्यवहार; याचिकाकर्ते कौस्तूभ गोखले यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2021 13:22 IST

ईडीकडे तक्रार करणार

कल्याण- कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील बेकायदा बांधकामात भूमाफिया, महापालिका अधिकारी आणि लोकप्रतिनिधीसह अन्य  सबंधित विभागात कोटय़ावधी रुपयांचा गैरव्यवहार होत आहे. हा पैसा कुठे जातो. त्यातून या परिसरात गुन्हेगारी वाढत आहे का असा सवाल माहिती अधिकाराचे कार्यकर्ते आणि बेकायदा बांधकाम प्रकरणातील याचिकाकर्ते कौस्तूभ गोखले यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणी ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी करणार असल्याची माहिती गोखले यांनी दिली आहे. 

महापालिका हद्दीतील बेकायदा बांधकाम प्रकरणी गोखले यांची याचिका उच्च न्यायालयात न्याय प्रविष्ट आहे. त्यांच्या याचिकेच्या आधारे राज्य सरकारने बेकायदा बांधकामाच्या चौकशीकरीता अग्यार समिती नेमली होती. अग्यार समितीने 2009 साली अहवाल तयार केला. हा अहवाल माहिती अधिकारात उघडही करण्यात आलेला आहे. बेकायदा बांधकामाची याचिका न्यायप्रविष्ट असताना गोखले यांनी महापालिका हद्दीत माजी आयुक्त गोविंद बोडके आणि विद्यमान आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या कार्यकाळात बेकायदा बांधकामे जास्त झाली असल्याचा आरोप केला आहे. ही बाब त्यांनी 1 सप्टेंबर 2021 रोजी सरकारच्या निदर्शनास आणून दिली आहे.

विहित वेळेत सरकारकडून उत्तराची अपेक्षा आहे. विहित वेळेत उत्तर न मिळाल्यास गोखले हे या प्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी करणार आहेत. महापालिकेच्या ग, ह, फ आणि ई प्रभागात बेकायदा बांधकामे सुरु आहे. तळ अधिक सहा, सात आणि आठ मजली बेकायदा इमारती उभारल्या जात आहेत. त्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. ग आणि फ प्रभागात 90 टक्के बेकायदा बांधकामे आहेत. या बेकायदा बांधकामाना पाणी पुरवठा केला जात आहे. गोखले यांनी ज्या बेकायदा बांधकामांच्या विरोधात तक्रारी केल्या आहेत. त्या विरोधात अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. 

अग्यार समितीच्या चौकशी अहवालानुसार महापालिका हद्दीत 67 हजार बेकायदा बांधकामे असल्याचे जाहिर करण्यात आले होते. या बांधकामाची तसेच 2007 नंतर झालेल्या बेकायदा बांधकाम प्रकरणी डय़ू प्रोसेस ऑफ लॉ ही प्रक्रिया पार पाडली गेली नाही. दरम्यान एका बिल्डरने बांधकाम प्रकरणी कारवाई न करण्यासाठी अधिका:यांना पैसे दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. या सगळ्य़ा पाश्र्वभूमीवर आयुक्तांनी बेकायदा बांधकामांना वीज पुरवठा दिला जाऊ नये अशी सूचना करणारे पत्र वीज वितरण कंपनीच्या अधिका:याना दिले आहे. आयुक्तांनी आधी बेकायदा बांधकामाची यादी करावी. त्यामुळे बेकायदा बांधकाम वीज कंपनीला व सामान्यांना कळणार कसे असा सवालही गोखले यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय