शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

खदान मृत्यू प्रकरण: 'आम्हाला पैसे नको, पाणी द्या, गायकवाड कुटुंबाने रामदास आठवलेंना सुनावले खडेबोल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 20:20 IST

Ramdas Athavale News: देसलेपाडा येथील गायकवाड कुटुंबातील पाच जणांचा संदप गावातील खदाणीत बुडून मृत्यू झाल्याची घटना 7 मे ला घडली होती. बुधवारी त्या कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन करायला गेलेल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना आम्हाला मदत नको, पाणी दया अशा शब्दात खडे बोल कुटुंबाने सुनावले.

डोंबिवली - देसलेपाडा येथील गायकवाड कुटुंबातील पाच जणांचा संदप गावातील खदाणीत बुडून मृत्यू झाल्याची घटना 7 मे ला घडली होती. बुधवारी त्या कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन करायला गेलेल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना आम्हाला मदत नको, पाणी दया अशा शब्दात खडे बोल कुटुंबाने सुनावले. संतापलेले कुटुंब आणि त्यावेळी झालेला गोंधळ पाहता आठवलेंना तेथून काढता पाय घ्यावा लागला.

पाच जणांच्या बाबतीत घडलेल्या दुर्घटनेनंतर गावातील पाणी टंचाईची समस्या प्रकर्षाने समोर आली होती. दरम्यान आतार्पयत खासदार, आमदार आणि राजकीय पक्षातील पदाधिका-यांनी गायकवाड कुटुंबियांची भेट घेऊन पाणी देण्याचे आश्वासन दिली. पाणी टंचाईमुळे कुटुंबातील पाच जणांचा जीव गमवावा लागला पण राजकारणी केवळ आश्वासन देतात पण पाणी काही देत नाहीत, आजही पाणी विकत घेऊनच त्याचा वापर करावा लागत आहे हा संताप बुधवारी गायकवाड कुटुंबानी बोलून दाखविला.

गायकवाड कुटुंबियांच्या सांत्वनासाठी जेव्हा आठवले आले तेव्हा त्यांनी गावाला भेडसावणा-या पाणी समस्येबाबत मार्ग काढण्यासाठी आयुक्त तसेच जिल्हाधिका-यांशी चर्चा केल्याचे सांगितले, पुढे बोलताना आठवलेंनी कुटुंबाला 50 हजार रूपयांची मदत करण्याचे आश्वासन देताच कुटुंबातील सदस्य संतापले ‘आम्हाला 50 हजार नको, पाणी द्या’ आमच्या घरातले जीव पाण्यावाचून गेलेत ते भरून तुम्ही देणार आहात का? दुर्घटना घडल्यानंतर पाणी मिळणे गरजेचे होते पण आमदार खासदार आले पण केवळ आश्वासन देऊन गेले. पण काही केले नाही. आजही आम्ही पाणी विकत घेतोय, पुन्हा अशा घडणार नाहीत याची दक्षता घ्या, खदाणी बंद करा, त्याला कुंपण घाला, लॉक करा, आम्हाला देणगीची गरज नाही, पाण्याची गरज आहे. तुम्ही येता सगळे सांत्वन करण्यासाठी ते आम्हाला पटत नाही अशा शब्दात आठवले यांना कुटुंबातील सदस्यांनी सुनावले. यावेळी अनपेक्षित झालेल्या गोंधळाने रिपाईचे पदाधिकारी आणि पोलिसांचीही चांगलीच तारांबळ उडाल्याचे पहायला मिळाले. तर संभाजी राजे शिवसेनेत जातीलछत्रपती संभाजी राजेंना यांना कोणत्या पक्षात जायचे असेलतर तो त्यांचा अधिकार आहे. मात्र शिवसेना राज्यसभेची उमेदवारी देत असलेतर ते जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांना यापुर्वी भाजपने राज्यसभा दिली होती. त्यामुळे त्यांनी भाजपमध्येच राहीले पाहिजे असा सल्लाही आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेkalyanकल्याण