शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

शाळेची फी थकविल्याने मानसिक त्रास, विद्यार्थ्याला आली भोवळ; शाळा व्यवस्थापनाने फेटाळले पालकांचे आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 21:02 IST

डोंबिवली पुर्वेकडील आजदेपाडा  परिसरात राहणारे मनोज गिरी यांचा मुलगा चंदन हा एमआयडीसी निवासी परिसरातील ग्रीन इंग्लिश हायस्कूलमध्ये दहावीच्या वर्षात शिकत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली:  शाळेची फी न भरल्याने वर्गात न बसविता बाजुकडील वर्गात एकटेच तीन तास बसविलेल्या दहावीतील विद्यार्थ्याला भोवळ आल्याची घटना येथील एमआयडीसीमधील ग्रीन इंग्लिश हायस्कूलमध्ये मंगळवारी घडली. फी न भरल्याने शाळेने वारंवार त्रास दिल्याने मानसिक स्थिती ढासळली आणि मुलाला भोवळ आल्याचा आरोप पालकांनी केला असून याप्रकरणी त्यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. दरम्यान शाळा व्यवस्थापनाने पालकांचे आरोप फेटाळले आहेत.

डोंबिवली पुर्वेकडील आजदेपाडा  परिसरात राहणारे मनोज गिरी यांचा मुलगा चंदन हा एमआयडीसी निवासी परिसरातील ग्रीन इंग्लिश हायस्कूलमध्ये दहावीच्या वर्षात शिकत आहे. नववी इयत्ता पास केल्यावर सध्या दहावीचे क्लास सुरू आहेत. मंगळवारी शाळेत आलेल्या चंदनला शिक्षकांनी वर्गात न बसविता दुसऱ्या वर्गात बसायला सांगितले. तुझ्या पालकांनी दोन वर्षाची फी भरली नाही, त्यांना बोलावून घे तो पर्यंत तुला इथेच बसावे लागेल असे सांगितले. चंदन जवळपास तीन तास एकटाच त्या वर्गात बसला होता. यात त्याची तब्येत बिघडली आणि त्याला भोवळ आल्याचा आरोप त्याचे वडील मनोज यांनी केला आहे. 

13 एप्रिलला देखील शाळेत चंदनला उभे करून ठेवले होते. त्याच्याबरोबर अन्य काही विद्याथ्र्यानाही शाळेने अशी शिक्षा केली होती याकडेही त्यांनी लक्ष वेधले. दरम्यान मनोज यांचे आरोप शाळा व्यवस्थापनाने फेटाळले आहेत. चंदनची दोन वर्षाची 26 हजार रूपये फी भरण्यात आलेली नाही. याबाबत त्याला बाजुच्या वर्गात बसण्यास सांगून पालकांना फोन करून बोलावून घेण्यास सांगितले. मधल्या सुट्टीत तो खेळायला देखील गेला होता. मात्र शाळा सुटल्यावर जिन्यातून उतरताना त्याला चककर आली. मानसिक त्रास दिल्याचा पालकांचा आरोप चुकीचा आहे, अशी प्रतिक्रिया शाळेचे डोंबिवली प्रोग्रेसिव्ह ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. अरूण पाटील यांनी दिली.

टॅग्स :Schoolशाळा