शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

बायको सोडून गेल्याने बिघडले संतुलन; बसची तोडफोड, बस चालकावरही हल्ल्याचा प्रयत्न

By मुरलीधर भवार | Updated: August 31, 2023 23:11 IST

बायको सोडून गेली म्हणून मानसिक तणावातुन केलं कृत्य 

कल्याण:  भर रस्त्यात एका माथेफिरूने बस अडवून बस चालकावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.बस चालकाने प्रतिकार केल्याने या माथेफिरूने कोयत्याने बस ची तोड फोड केली इतकेच नव्हे आणखी दोन बसची तोड फोड केली. कल्याण रामबाग परिसरात रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.मोठ्या धाडसाने बस चालक व कंडक्टरने या माथेफिरूला पकडून महात्मा फुले पोलिसांच्या ताब्यात दिले. बाळू साबळे असे या माथेफिरूचे नाव असून काही वर्षांपूर्वी त्याची पत्नी त्याला सोडून गेली त्यानंतर तो मानसिक तणावात होता. याच मानसिक तणावातून त्याने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आज सायंकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास कल्याण पश्चिम राम बाग परिसरात एका माथेफिरूने हातात कोयता घेत चांगलाच धिंगाणा घातला .केडीएमटीची बस अडवून बस चालकावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.चालकाने प्रतिकार केल्याने या माथेफिरूने बसवर कोयत्याने प्रहार करत बसेस च्या काचा फोडल्या.यानंतर पाठीमागून येणाऱ्या दोन बसेसच्या काचा फोडल्या.अचानक घडलेल्या या घटनेमूळे परिसरात एकच खळबळ उडाली. बस चालक व कंडक्टरने मोठ्या धाडसाने या माथेफिरूला पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनेची माहिती नंतर महात्मा फुले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या माथेफिरूला ताब्यात घेतले. बाळू साबळे असे या माथेफिरूचे नाव असून काही वर्षांपूर्वी त्याची पत्नी त्याला सोडून गेली त्यानंतर तो मानसिक तणावात होता. याच मानसिक तणावातून त्याने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली. महात्मा फुले पोलिसांनी बाळू साबळे याला ताब्यात घेत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

टॅग्स :kalyanकल्याणBus DriverबसचालकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस