शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या चालक-वाहकांनाच मास्कचे वावडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 23:55 IST

श्वास घेण्यास होतो त्रास : शहरांतील प्रदूषणामुळे जीव होतो घाबराघुबरा

कल्याण :  कोरोनामुळे प्रत्येकाने काळजी घ्यावी असे वारंवार सरकारकडून सांगितले जाऊनही अनेकजण नियमांकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. श्वास घ्यायला त्रास होतो असे सांगून प्रवासाच्यावेळी मास्क घालणे टाळतात असे दिसून आले आहे.कल्याण-डोंबिवली आगारातील चालक-वाहकही कामाच्याठिकाणी मास्क घालताना दिसले नाही. मास्क घातले की श्वास घेण्यास त्रास होतो, असे त्यांनी सांगितले. रस्ते यांची दुरवस्स्था झाल्याने धूळ नाकातोंडात जाऊन जीव नकोसा होतो. त्यातच मास्क घातले तर जीव घाबराघुबरा होतो अशी कारणे सांगण्यात आली. मास्क घालायला पाहिजे हे आम्हाला मान्य आहे, पण वरील कारणांमुळे घालत नाही. काही प्रवासीही विनामास्क फिरताना दिसत होते.बस चालवताना तोंडावर मास्क असल्याने श्वास कोंडला जातो. त्यातच डोंबिवली शहरात प्रदूषणाचे प्रमाण अधिक असल्याने त्याचा त्रास सहन करावा लागतो. त्यात मास्क घातले तर अधिकच त्रास होतो. या कारणांमुळे मास्क घालत नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता मास्क घालणे हे प्रकृतीसाठी चांगलेच आहे, पण श्वास कोंडत असल्याने ते घालण्याचे टाळतो.            - मास्क न घातलेला, चालकमाझे ह्रदयाची छोटी शस्त्रक्रिया झाली असल्याने मास्क घातल्यास दम लागतो, धाप लागते. यामुळे मी मास्क घालणे टाळतो असे कल्याण आगारातून प्रवास करणाऱ्याने सांगितले. कोरोनाचे नियम पाळा हे वारंवार सांगितले जाते, ते अगदी बरोबर आहे. पण माझ्यासारख्या रुग्णाला सतत मास्क घातल्यास ते अधिक त्रासदायकच ठरते.           - मास्क न घातलेला, प्रवासीकल्याण-डोंबिलीतील प्रदूषण आणि त्यातच रस्त्यांची सुरु असलेली कामे, धुळीचे साम्राज्य यामुळे मास्क न लावताच सतत कोंडल्यासारखे जाणवते. त्यातच जर मास्क घातला तर जीव घाबरा होतो. यामुळे ड्युटीवर असताना मास्क घालणे टाळतो. सध्याच्या काळात मास्क घालणे हे गरजेचे आहे, असे पटते. पण श्वास कोंडत असल्याने ते टाळतो.- मास्क न घातलेला, वाहक

टॅग्स :state transportएसटी