शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगत्वाचा फायदा उठवित तो करीत होता लूटमारी; मानपाडा पोलिसांनी आवळल्या दोघांच्या मुसक्या

By प्रशांत माने | Updated: December 22, 2023 18:54 IST

हे दोघेही मुळचे उत्तर प्रदेशचे रहिवाशी आहेत.

डोंबिवली: महिलेच्या गळयातील ७२ हजार रूपये किमतीची सोन्याची चेन खेचून लंपास करणा-या दुचाकीवरील दोघा चोरट्यांना पकडण्यात मानपाडा पोलिसांना यश आले आहे. महत्वाचे म्हणजे दोघा चोरटयांपैकी एकजण कमरेपासून खाली पुर्णपणे दिव्यांग आहे तर दुसरा चोरटा त्याला दुचाकीवर पाठीमागे बसवायचा आणि दिव्यांग असलेला चोरटा चेन स्नॅचिंग करायचा असे पोलीस तपासात समोर आले आहे.

डोंबिवली पुर्वेकडील मानपाडा हद्दीतील विजय सेल्सच्या समोरून आपल्या मुलीबरोबर जात असलेल्या वसंताकुमारी नायर या महिलेल्या गळयातील चेन दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी लंपास केल्याची घटना १७ डिसेंबरला दुपारी पावणेतीनच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्हयाच्या तपासकामी सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे आणि वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक अविनाश वनवे आणि प्रशांत आंधळे यांचे पथक नेमले होते.

पथकांनी सीसीटिव्ही कॅमेरांचा आधार घेऊन तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे दोेघा चोरटयांना रायगड जिल्हयातील माणगाव परिसरातून अटक केली. विरू देवेंद्र राजपुत (वय २३) आणि सुखविर ओमप्रकाश रावल ( वय २८ ) अशी अटक आरोपींची नावे आहेत. धक्कादायक बाब म्हणजे सुखविर हा कमरेपासून खाली दिव्यांग आहे. तो बाईकवर मागे बसायचा आणि विरु हा मोटारसायकल चालवायचा. संधी मिळताच सुखविर हा महिलांच्या अंगावरील दागिने खेचायचा. त्यानंतर दोघेही मोटारसायकलवरून पसार व्हायचे.

चेन खेचायचे सुखविरला मिळायचे, पाच लाख रूपये

हे दोघेही मुळचे उत्तरप्रदेशचे रहिवाशी आहेत. या दोघांनी डोंबिवली मानपाडा, खांदेश्वर, पनवेल शहर आणि रोहा या पाच शहरात चेन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची माहीती वरीष्ठ पोलिस निरिक्षक होनमाने यांनी दिली. या दोघांकडून सहा लाख ३२ हजार २१० रूपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि गुन्हे करण्यासाठी वापरलेली ९० हजार रूपयांची मोटारसायकल असा सात लाख २२ हजार १२० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सुखविर हा दिव्यांग आहे परंतू तो मोटारसायकलवर पाठिमागे बसून महिलांच्या गळयातील सोन्याची चेन खेचायचा. याचे त्याला पाच लाख रूपये मिळायचे त्याला डोंबिवली शहराची माहिती देखील होती अशीही माहीती तपासात समोर आली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसArrestअटक