शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Kalyan Crime: शौचालयाच्या बांधकामावरून वाद, तरुणावर तलवारीने क्रूर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 14:02 IST

Man Attacked With Sword In Kalyan: कल्याण पश्चिमेतील उंबर्डे येथे रविवारी (०१ जून २०२४) धक्कादायक घटना घडली.

कल्याण पश्चिमेतील उंबर्डे येथे रविवारी (०१ जून २०२४) धक्कादायक घटना घडली. शौचालयाच्या बांधकामावरून पेटलेल्या वादातून एका २४ वर्षीय तरुणावर तलवारीने हल्ला करण्यात आल्याची बातमी समोर आली. याप्रकरणी शेजारी राहणाऱ्या कुटुंबातील सदस्यांविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

विक्रांत जाधव या २४ वर्षीय तरुणावर शेजाऱ्याने तलवारीने क्रूर हल्ला केला. या हल्ल्यात विक्रांत गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विक्रांतच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, शेजारच्या गायकवाड कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या मुलावर तलवारीने हल्ला केला. 

खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलयाप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी भारतीय न्याय संहिताच्या (बीएनएस) कलम ११८ (धोकादायक शस्त्रांनी दुखापत करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

दोन्ही कुटुंबांमध्ये वर्षानुवर्षे वाद सुरूमालमत्तेच्या मुद्द्यांवरून दोन्ही कुटुंबांमध्ये वर्षानुवर्षे वाद सुरू असल्याचे वृत्त आहे.  घराशेजारील शौचालयाच्या बांधकामावरून गायकवाड कुटुंबांनी जाधव कुटुंबांना जीवे मारण्याची धमकी दिली होती, अशी तक्रार विक्रांतच्या वडिलांनी काही दिवसांपूर्वी स्थानिक पोलीस ठाण्यात दाखल केली, अशी माहिती आहे.

टॅग्स :kalyanकल्याण