मुरलीधर भवार-कल्याण : राजाराणी एक्सप्रेसने प्रवास करणाऱ््या एका तरुणीचा विनयभंग करणाऱ््या तरुणाला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव माविया असरार शेख असे आहे.
ठाण्यातून सायंकाळी कल्याणच्या दिशेने येणाऱ्या उपनगरीय गाड्यांना प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे ठाण्याहून कल्याणच्या दिशेने येणारे प्रवासी लांब पल्ल्याच्या गाड्यांनी कल्याणच्या दिशेने प्रवास करतात. अनेक लांब पल्ल्याच्या मेल एक्सप्रेस गाड्यांना ठाण्याला आणि कल्याणला थांबा आहे. त्यामुळे प्रवासी या गाडीने ठाणे ते कल्याण असा प्रवास करतात. एका तरुणाने राजाराणी एक्सप्रेस गाडी ठाण्यातून पकडली. त्याच गाडीत एक तरुणही देखील चढला. त्याने त्या तरुणीशी अंगलगट केली. तिचा विनयभंग केला. ही तरुणी कल्याणला उतरली. तिने घडल्या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
या तरुणीच्या विनयभंग प्रकरणी आरोपी माविया असरार शेख याला अटक केली आहे अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक पंढरीनाथ कांदे यांनी दिली आहे.