शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पिस्तुलसह दोन जिवंत काडतुस बाळगणाऱ्यास अटक! कल्याण गुन्हे अन्वेषणची कारवाई

By प्रशांत माने | Updated: April 10, 2025 19:19 IST

प्रशांत माने  लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : पुर्वेकडील नेतीवली चक्कीनाका परिसरात कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कारवाई करून देशी ...

प्रशांत माने 

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण: पुर्वेकडील नेतीवली चक्कीनाका परिसरात कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कारवाई करून देशी बनावटीच्या पिस्तूलसह दोन जिवंत काडतुस आणि १ पुंगळी असा ६२ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. परवानगीशिवाय ही पिस्तुल आणि काडतुस बाळगल्याप्रकरणी बिनधास अनंता म्हात्रे याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई मिथुन राठोड यांच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिस ठाण्यात म्हात्रे विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

गुन्हे अन्वेषणचे पोलिस शिपाई राठोड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, चक्कीनाका, नेतीवली परिसरातील रिजेंन्सी पार्क येथे राहणा-या बिनधास म्हात्रे नामक व्यक्तीने त्याच्या घरात देशी बनावटीचे पिस्तुल व काडतुसे लपवून ठेवली आहेत. ही माहीती मिळताच गुन्हे अन्वेषणचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक किरण भिसे, सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक दत्ताराम भोसले, पोलिस हवालदार विजय जिरे, विलास कडू, पोलिसनाईक दिपक महाजन, पोलिस शिपाई विजेंद्र नवसारे, महिला पोलिस हवालदार ज्योत्स्ना कुंभारे आदिंच्या पथकाने म्हात्रे याच्या घरावर धाड टाकून त्याला पिस्तुल आणि जिवंत काडतुसांसह ताब्यात घेतले. दरम्यान म्हात्रे याने पिस्तुल का बाळगले होते हे समजू शकलेले नाही याबाबत तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक शिंदे यांनी दिली.

टॅग्स :kalyanकल्याणCrime Newsगुन्हेगारी