शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीतील एमआयडीसीमध्ये मोठी आग; कचरा पालापाचोळा जळून खाक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 14:06 IST

Dombivli Fire : कचऱ्याला मोठ्या प्रमाणात आग लागल्याची  घटना घडल्याने एकच खळबळ उडाली.

डोंबिवली - डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात अनेकदा लहान मोठ्या दुर्घटना घडत असतात. शुक्रवारी सकाळी सव्वा आठ वाजता परिसरात कचऱ्याला मोठ्या प्रमाणात आग लागल्याची  घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. सर्व्हिस रोडवरील मोनार्च सोसायटी आणि वंदे मातरम् उद्यानजवळ मोठ्या प्रमाणात कचरा व झाडांचा पालापाचोळा पडलेला होता. या कचऱ्याने अचानक पेट घेतला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आग लागलेल्या जागेखालून उच्च दाब पेट्रोलियम उत्पादन पाईपलाईन, मुंबई - मनमाड पाईपलाईन जात असून तसा चेतावणी (Warning) असा बोर्ड लावण्यात आला आहे. तसेच या जागेवरून हायटेन्शन वायर जात आहे. सुदैवाने येथील काही नागरिकांनी मिळून पाणी टाकून आग विझविण्यात यश मिळविले. या आगीमुळे जवळचा झाडांना फटका बसला आहे अशी माहिती स्थानिक नागरिक राजू नलावडे यांनी दिली. नागरिक कचरा आणि पालापाचोळा, नारळाचा झाडाचा झावळ्या इत्यादी मोठ्या प्रमाणात टाकत असतात. केडीएमसी पण याकडे गांभीर्याने पाहत नाही असा आरोप होत आहे. 

जर या आगीमुळे जमिनीखालील पाइपलाईनपर्यंत आग धुमसून गरम होऊन काही ठिणगी लागली तर मोठी दुर्घटना झाली असती. याला येथे कचरा टाकणारे बेजबाबदार नागरिक, केडीएमसी, एमआयडीसी हे जबाबदार राहतील. यापुढे केडीएमसीने अशा कचरा टाकणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवर कडक कारवाई करावी.- राजू नलावडे, स्थानिक नागरिक 

टॅग्स :fireआगdombivaliडोंबिवली