शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचीच आगेकूच राहील : पटोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 00:54 IST

गोळवलीत डॉ. वंडार पाटील यांच्या निवासस्थानी बैठक : नव्या चेहऱ्यांना प्राधान्य

डाेंबिवली : महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीची आगेकूच कशी राहील याची मोर्चेबांधणी करण्यासाठी काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कल्याण जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. वंडार पाटील, युवक जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांची त्यांच्या गोळवली येथील निवासस्थानी रविवारी भेट घेतली. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.या बैठकीत पक्ष बांधणीसह महाविकास आघाडीच्या समीकरणासंदर्भात सुमारे पाऊण तास चर्चा झाली. येथील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्यासह शिवसेना महाविकास आघाडीचा धर्म पाळून जास्तीत जास्त संख्येने नगरसेवक कसे निवडून येतील, यादृष्टीने त्यांनी विचारमंथन केले. पाटील यांना जवळपास चाळीस वर्षांचा अनुभव असून, त्यांचे मार्गदर्शन घेण्याचे आवाहन पटोले यांनी माजी नगरसेवक, कार्यकर्त्यांना केले. आघाडीच्या तिन्ही पक्षांची ताकद मिळून तीन आकड्यांमध्ये भरघोस यश नक्कीच मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यादृष्टीने उमेदवार आणि मतदारांचे पॉकेट्स कसे असतील यासंदर्भात युवकांना मार्गदर्शन करण्याची गरज असल्याचे मत वंडार पाटील यांनी व्यक्त केले. त्यावर पटोले म्हणाले की, राज्यभरातून, प्रसंगी देशभरातून जे काही सहकार्य लागेल, ते निवडणुकीसाठी दिले जाईल. निवडणुकीत यश मिळवून पक्षाला बळकटी देण्यासाठी जे सहकार्य लागेल, त्यासाठी दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून जास्तीत जास्त संख्येने येथे नगरसेवक निवडून कसे येतील, हे स्थानिक नेत्यांनी बघावे, असे ते म्हणाले.युवकांना निवडणुकीत जास्तीत जास्त संधी देण्यात यावी, असे मत सुधीर पाटील यांनी मांडले. त्यावर युवकांना प्राधान्य देऊन नवीन चेहरे आपण राजकारणासमोर आणि नागरिकांसमोर आणून पक्षाला बळकटी मिळेल यासाठी प्रयत्न करू या, असे पटोले म्हणाले. आगामी काळात महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणासाठी निवडणुकीदरम्यान महिलांनादेखील संधी देण्याबाबत चर्चा झाली. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पुरेसे सदस्य निवडून आले असून, त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. स्थानिक समस्या, विकासाचे मुद्दे आणि विरोधकांची कमजोरी शोधून त्याचा नागरिकांसमोर पर्दाफाश करण्यावर यावेळी प्रामुख्याने चर्चा झाली. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाNana Patoleनाना पटोले