शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
"ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

मदनगड संवर्धन मोहीम यशस्वीपणे पडली पार;

By मुरलीधर भवार | Updated: March 16, 2024 15:02 IST

दुपारचे जेवण करून परत एकदा जोमाने कामाला सुरुवात झाली संध्याकाळ पर्यंत नियोजन केले होते त्याच्या पेक्षा कैपटीने जास्तच काम सदस्यानं करण्यात आले होते.

कल्याण-मदन गड संवर्धन माेहिम गिरीमित्र प्रतिष्ठान संस्थेतर्फे नुकतीच पार पडली. या दोन दिवसीय मोहिमेत ८ सदस्यांनी सहभाग घेतला. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एकमेव वनदुर्ग असलेल्या वांजळे गावच्या मागच्या बाजूला मदगड आहे.

रितसर महाराष्ट्र पुरातत्त्व विभागाची पत्र देऊन परवानगी घेण्यात आली होती रात्रीचा गाडीने प्रवास करून संस्थेचे सदस्य मध्यरात्री वांजळे गावात पोहचले, पहाटे पर्यंत थोडा वेळ गावातील मंदिरात आराम करून सकाळी चहा - नाश्ता उरकून काम करायचे सर्व साहित्य आणि दुपारच्या जेवणाचे सगळे सामान घेऊन मदगड किल्ल्यावर पोहचले. कुठे आणि काय काम करायचे आहे याची पाहणी आणि नियोजक करून सकाळी कामाला सुरुवात झाली. किल्ल्यावरील वाड्यांचे जोत्यावर वाढलेली झाडी - झुडपे काढण्यात आली आणि सर्व परिसर मोकळा करण्यात आला.

दुपारचे जेवण करून परत एकदा जोमाने कामाला सुरुवात झाली संध्याकाळ पर्यंत नियोजन केले होते त्याच्या पेक्षा कैपटीने जास्तच काम सदस्यानं करण्यात आले होते. संध्याकाळी दिवसभराचे काम थांबाऊन सगळे सदस्य गावात परत आले. गावच्या सरपंचांना भेटून दिवसभर केलेल्या कामाची माहिती दिली. दुसऱ्या दिवशी सदस्य गडाकडे मार्गस्थ झाले. किल्ल्यावर करतं असलेले संवर्धनाचे काम बघायला ७५ वर्षाचे वांजळे गावाचे सरपंच आत्माराम गायकर, बोर्ली पंचायतन शिवसेना शाखाप्रमुख गजू भाटकर यांनी भेट देऊन काम करणाऱ्या सदस्यांचा उत्साह वाढवला होता. या मोहिमेत वांजळे गावाचे उत्साही ग्रामस्थ भालचंद्र जाधव यांनी सहभाग घेतला. मोहिमेत गिरीमित्र प्रतिष्ठान संस्थेचे मंगेश कोयंडे, दिगंबर पाटील, अनिश खाडे, राजू घोळे, मंगेश ठाकूर, शहाजी घाग, हेमंत लाड आणि आरती गुरव सहभागी झाले होते.

मदगड किल्ल्याचे संवर्धन व्यवस्थित झाले तर हा किल्ला पर्यटनाचे केंद्रबिंदू होऊ शकतो. वांजळे गावाला एक वेगळी ओळख निर्माण होईल. अनेक पर्यटक आणि ट्रेकर या किल्ल्याला भेट देतील आणि गावातील आणि परिसरातील लोकांना रोजगाराचे साधन उपलब्ध होईल. ह्या किल्ल्यापासून काही अंतरावर दिवेआगर, श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर ही निसर्गसंपन्न पर्यटन गावं आहेत आणि हा किल्ला अग्रस्थानी असेल.