शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
5
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
6
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
7
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
8
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
9
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
10
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
11
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
12
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
13
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
14
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
15
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
16
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
17
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
18
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
19
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
20
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...

लोहमार्ग पोलिसांची महिला सुरक्षा, आर्थिक फसवणुकी विरोधात जनजागृती 

By अनिकेत घमंडी | Updated: August 21, 2023 11:42 IST

डोंबिवली लोहमार्ग पोलिसांचा पुढाकार 

अनिकेत घमंडी, डोंबिवली: दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महिलांवरील अन्यायाच्या घटनांची दखल घेत वरिष्ठांनी आदेश दिल्यानुसार डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी रेल्वे डब्यात, स्थानकात, पादचारी।पुलांवर, तिकीट घराचा परिसर आदी सर्व ठिकाणी महिलांविषयक कायद्याची आणि आर्थिक फसवणूक संदर्भात जनजागृती उपक्रम हाती घेतला आहे. त्याद्वारे शेकडो महिलांना संदेश देऊन सतर्क राहण्याचा सल्ला वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी दिला.

गेल्या आठवड्यापासून अधिक जोमाने सुरू झालेल्या या उपक्रमासंदर्भात सोमवारी त्यांनी माहिती दिली. त्या म्हणाल्या की, महिलांच्या सुरक्षेकरीता रात्रीच्या व पहाटेच्या वेळी महिलांकरीता राखीव डब्यांमध्ये रेल्वे पोलीसांकडुन सुरक्षा कर्मचारी नेमण्यात आले आहेत. महिला प्रवाशांनी महिलांकरीता राखीव असलेल्या डब्यातुन प्रवास करावा. महिलांनी एकटे राखीव डब्यातुन प्रवास करतांना सुरक्षा कर्मचारी डब्यामध्ये आहे यांची खात्री करावी. सुरक्षा कर्मचारी नसल्यास, प्रवाशी असलेल्या डब्यातुन प्रवास करावा.     

रेल्वे स्टेशन अथवा रेल्वे प्रवासात कोणत्याही प्रकारची छेडछाडीची घटना होत असल्यास त्याची माहिती तात्काळ कर्तव्यावरील पोलीस अंमलदार अथवा रेल्वे पोलीस हेल्पलाईन क्र. १५१२ यांना कळवावी. लोकल गाडयांमध्ये चढण्यापुर्वी उतरणाऱ्या प्रवाशांना प्रथम उतरु द्यावे. लोकल गाडयांमध्ये चढतांना अथवा उतरतांना व प्रवासादरम्यान आपला मोबाईल, सॅगबॅग व इतर मौल्यवान चिज वस्तुंवर लक्ष द्यावे. लोकल मध्ये चढतांना अथवा उतरतांना आपल्या जवळील सॅगबॅग पाठीवर न लावता समोर धरावी जेणेकरुन चोरांना चोरी करण्याची संधी मिळणार नाही, तसेच गर्दीत इतर प्रवाशांना त्रास होणार नाही, याची काळजी सगळ्यांनी घ्यावी.

प्रवासादरम्यान रॅकवर ठेवलेली सॅगबॅग व इतर सामान वारंवार चेक करुन रॅकवर असल्याची खात्री करावी. प्रवासा दरम्यान दरवाजात लटकुन प्रवास करु नये त्यामुळे जिवीतास तसेच मालमत्तेस धोका होऊ शकतो यावर जनजागृती करण्यात आली. तसेच आर्थिक फसवणूक विरोधात जन जागृती कार्यक्रमात राज्यात अल्पावधीत पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांना लुबाडण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. फसव्या गुंतवणूक योजनांमधून हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केली जाते. त्यामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झालेले आहेत. राज्यात काही भामटे पैसे दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवून, खोट्या स्कीम काढून इतरांपेक्षा जास्त व्याजदराने आमिष दाखवून हजारो लोकांची फसवणूक करीत आहेत. अशा योजनांपासून जनतेने दूर राहावे व आपली फसवणूक टाळावी.

पासपोर्ट, आधारकार्ड, पॅनकार्ड तात्काळ काढून देण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक होऊ शकते. एजंट मार्फत घर, जमीन खरेदीच्या वेळी सावध रहा. त्यामध्ये देखील पैशाची मागणी करून आर्थिक फसवणूक होऊ शकते. ऑनलाइन खरेदी करिता अनेक फसव्या साईड्स इंटरनेट वर उपलब्ध आहेत त्याच्या कडून देखील अनेकांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. त्याकरिता कोणतेही आर्थिक व्यवहार करताना अधिक दक्ष व सतर्क राहावे असे आवाहन पोलिसांनी सामजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने केले. त्यासाठी पोलीस उपनिरीक्षक, दोन अंमलदार, व ६ होमगार्ड अशी स्वतंत्र पथक तयार करून त्यांना दैनंदिन कामाच्या जबाबदारीसह हे जनजागृती करण्याची जबाबदारी दिली आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवली