शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Lift accident: मुलाला अ‍ॅडमिट करण्यासाठी जात होते; डोंबिवलीतील खाजगी रुग्णालयात लिफ़्टचा अपघात, दाम्पत्याच्या पायाला गंभीर दुखापत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 02:55 IST

Lift collapse in Dombivali Private hospital: डोंबिवली पूर्वेकडील एका  खाजगी रुग्णालयात शुक्रवारी  संध्याकाळी उशिरा हा अपघात झाला.

- मयुरी  चव्हाण

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : कोरोना संकटाच्या काळात राज्यात  विविध रुग्णालयांत  दुर्घटना घडत आहेत. भंडारा, नाशिक, भांडुप, विरारनंतर आता डोंबिवलीमधील एका खाजगी रुग्णालयात  लिफ़्टचा अपघात  झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अपघात झाल्याचे संबंधित रुग्णालय प्रशासनाने  देखील मान्य केले असून यावर अधिक बोलण्यास नकार दिला. मात्र या दुर्घटनेत जखमी झालेल्या महाजन कुटुंबियांनी आम्ही  या दुर्घटनेतून थोडक्यात वाचलो, अशी प्रतिक्रिया "लोकमतशी" बोलताना दिल्या आहेत. त्यामुळे  रुग्णालयांमध्ये  फायर ऑडिट सोबतच आता लिफ़्ट ऑडिट करण्याची  देखील गरज निर्माण झाली आहे. (Lift mishap in Dombivali Private hospital, couple seriously injuered.)

 डोंबिवली पूर्वेकडील एका  खाजगी रुग्णालयात शुक्रवारी  संध्याकाळी उशिरा हा अपघात झाला. जखमींनी दिलेल्या माहितीनुसार या लिफ्टमध्ये साधारण  4  व्यक्ती  होत्या. यापैकी डोंबिवली मधील गांधीनगर परिसरात राहणारे  दिलीप महाजन आणि  आशा महाजन  हे देखील जखमी झाले असून त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. पूर्वेकडील शिवम रुग्णालयात या महाजन  दाम्पत्यावर उपचार सुरु असून त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. महाजन कुटुंबीय  दुर्घटना झालेल्या रुग्णालयात आपल्या मुलाला  अ‍ॅडमिट  करण्यासाठी गेले होते. यावेळी पहिल्या मजल्यावरुन दुसऱ्या मजल्यावर जाताना  रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याने लिफ़्ट मधील बटन  दाबले आणि लिफ़्ट मध्येच अडकली आणि एकदम खाली कोसळली असे जखमींचे म्हणणे आहे.  सुदैवाने यामध्ये महाजन यांच्या मुलाला गंभीर दुखापत  झाली नाही. या घटनेच्या माहितीबद्द्ल लोकमतने मानपाडा पोलिसांशी  संपर्क साधला असता त्यांनी या घटनेबद्दल आपल्याला काही माहीत नसून कदाचित दुसऱ्या पोलीस स्थानकात याची नोंद झाली असावी असे उत्तर  दिले.  

दुर्घटनेवर बोलण्यास रुग्णालयाचा नकार

दुर्घटनेच्या व्याप्तीबद्दल  संबंधित रुग्णालयाने बोलण्यास नकार दिला असला तरी शिवम  रुग्णालयाच्या नोंद वहीमध्ये जखमींची नावे  असल्याचे  स्पष्ट झाले असून तसा पुरावा "लोकमतकडे"  प्राप्त झाला  आहे.  कॅमेरासमोर जखमींनी आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. त्यामुळे या घटनेची दखल  संबंधित यंत्रणा घेतात का? की आळीमिळी गुपचिळीचे धोरण अवलंबतात ते पाहावे लागेल. 

मुलाला  ऍडमिट करण्यासाठी आम्ही रुग्णालयात गेलो होतो. त्यावेळी रुग्णालयाच्या कर्मचा-याकडून कोणतंतरी बटन दाबलं गेलं. लिफ़्ट मध्येच अडकली आणि अचानक खाली कोसळली. 15 ते 20 मिनिट आम्ही लिफ़्ट मध्येच होतो. - आशा महाजन, जखमी.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलAccidentअपघातdombivaliडोंबिवली