शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

थोडक्यासाठी ॲडमिशन जाते तेव्हा जीव जळतो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 09:42 IST

मराठा समाजातील तरुण-तरुणींची व्यथा

प्रशांत मानेकल्याण : आम्ही परीक्षेचा मनापासून अभ्यास करतो. जास्तीत जास्त गुण मिळवण्याकरिता घासतो; परंतु अगदी दोन-चार किंवा अर्ध्या गुणाने आम्हाला प्रवेश नाकारला जातो. डोनेशन देऊन प्रवेश घेण्याइतकी आमची ऐपत नाही. त्यामुळे आम्हाला शिक्षणात आरक्षण हवेच, अशी भावना विघ्नेश साळुंखे याने व्यक्त केली. वैष्णव पवार म्हणाला की, मराठा समाजातील विद्यार्थी अभ्यासात, गुणवत्तेत कमी नाहीत; पण हातातोंडाशी आलेली प्रवेशाची संधी गमावतो तेव्हा अक्षरश: रडकुंडीला येतो. माझ्यासारख्या लक्षावधी मुला-मुलींची लढाई मनोज जरांगे-पाटील लढत आहेत. त्यांना पाहायला, ऐकायला आणि त्यांचे हात बळकट करायला आम्ही आलो आहोत.

मराठा समाज आर्थिक मागासलेला असल्याचा अहवाल गायकवाड समितीने दिला आहे. हाताच्या बोटावर मोजता येतील इतकाच मराठा समाज पुढारलेला आहे. समाजाची संख्या मोठी असल्याने टक्केवारी अधिक दिसते. समाजातील मुलांना शैक्षणिक आरक्षणाची संधी उपलब्ध झालीच पाहिजे, असे मत नितीन सकपाळ याने व्यक्त केले. 

पोटे मैदान दुमदुमले‘एक मराठा, लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’ अशा घोषणांनी कल्याण पूर्वेकडील पोटे मैदान दुमदुमले. निमित्त होते मराठा क्रांती मोर्चाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेचे. मोठ्या संख्येने मराठा बांधव आणि भगिनींनी गर्दी केली होती. 

शिंदे गटानेही लावला बॅनरजरांगे-पाटील यांच्या सभेच्या निमित्ताने ‘एकच मिशन, मराठा आरक्षण’ असे बॅनर मराठा क्रांती मोर्चा कल्याण यांच्या वतीने झळकविण्यात आले होते. एका बॅनरवर खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह शिंदे गटाच्या माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांचे फोटो होते. 

इतर समाजातील तरुणांनाही भुरळइतर समाजांमध्येदेखील जरांगे-पाटील यांची क्रेझ आहे.  जरांगे-पाटील यांचा चाहता असलेला ओमकार केदारे हा विद्यार्थी भाषण ऐकण्यासाठी आला होता. जरांगे-पाटील हे मांडत असलेली भूमिका रास्त असून, समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, असे मत त्याने मांडले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील