- सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-४, श्रीराम चौकातील हॅन्ड्रेड बार मध्ये शुक्रवारी मध्यरात्री पर्यंत महिला वेटर्सने तोकडे कपडे घालून अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघड झाला. विठ्ठलवाडी पोलिसांनी ५ महिला वेटरसह एकूण ९ जणाला अटक करून गुन्हा दाखल केला. हॅन्ड्रेड बार चालक माजी नगरसेवक असल्याचे बोलले जात आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-४, श्रीराम चौकात हॅन्ड्रेड बार असून शुक्रवारी मध्यरात्री पर्यंत महिला वेटर्सनी तंग तोकडे कपडे घालून ग्राहका सोबत अश्लील चाळे करीत असल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी रात्री सव्वा एक वाजण्याच्या दरम्यान धाड टाकली असता, महिला वेटर्स तंग व तोकडे कपडे घालून ग्राहका सोबत अश्लील चाळे करीत असल्याच्या मिळून आल्या. याप्रकरणी पोलिसांनी बालेंद्र तेजबहादूर सिंग, तुलसीदास बद्रीचंद वसिटा, जेबा इच्छा शेख, अनामिका राम चौधरी, उजाला एमडी अस्लम परवीन, कोमल जिले सिंग, मीना बहादूर थापा, गणेश बाळू जाधव व अंकित कुंजबिहारी शर्मा अशा नऊ जणांना अटक करून गुन्हा दाखल केला. हॅन्ड्रेड बार चालक माजी नगरसेवक असल्याचे बोलले जात असून त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
अँपल बारवर कारवाई श्रीराम चौकातील अँपल बार शुक्रवारी रात्री उशिरा पर्यंत सुरू ठेवून शासकीय आदेशाचा भंग केल्याचा ठपका विठ्ठलवाडी पोलिसांनी ठेवला. रोहित यशवंत पांडव व दुर्गेश महेंद्र पांडे या बार चालक व व्यवस्थापकाला अटक करून गुन्हा दाखल केला.