शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

किरकोळ वादातून हत्या; पिसवली टाटा पॉवर हाऊस परिसरातील घटना 

By प्रशांत माने | Updated: June 26, 2023 15:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली: किरकोळ वादातून एकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुर्वेकडील पिसवली टाटा पॉवर हाऊस नाका परिसरात रविवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली: किरकोळ वादातून एकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुर्वेकडील पिसवली टाटा पॉवर हाऊस नाका परिसरात रविवारी रात्री ११ च्या सुमारास घडली. दरम्यान मानपाडा पोलिसांकडून तासाभरात आरोपीला अटक करण्यात आली. किरण प्रभाकर शिंदे (वय २५) रा. महात्मा गांधी नगर, पिसवली असे आरोपीचे नाव आहे. शिंदे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहीती मानपाडा पोलिसांनी दिली.

टाटा पॉवर हाऊस परिसरात राहणारा आणि व्यवसायाने रिक्षाचालक असलेल्या शैलेश शिलवंत उर्फ बाळा (वय ३२) याची नाका कामगार असलेल्या किरण शिंदे याच्याशी ओळख होती. दोघेही एकाच परिसरात राहत होते. रविवारी दोघांमध्ये किरकोळ कारणांवरून वाद झाला. त्या वादातून किरणने त्याच्याकडील चाकूने शैलेशवर सपासप वार केले. यात शैलेश गंभीर जखमी झाला मोठया प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला.

थरार सीसीटिव्हीत कैद 

चाकूने शरीरावर ठिकठिकाणी वार केल्यावर शैलेश जीव वाचविण्यासाठी काही अंतरापर्यंत पळत गेला. आरोपी किरण हा देखील त्याच्या पाठीमागे पळत होता. हा सर्व थरार सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाला आहे.  

औरंगाबादला पळून जायच्या आधीच आरोपीला ठोकल्या बेडया

घटनेची माहीती मिळताच मानपाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आजूबाजूच्या परिसरात चौकशी केली असता कोणी काहीच माहीती दिली नाही. मात्र सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे आरोपी किरणला तासाभरात अटक केली. पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक सुरेश मदने, सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश वनवे, सुनिल तारमळे, दत्तात्रय सानप, ज्ञानोबा सूर्यवंशी, पोलिस उपनिरीक्षक प्रदीप गायकवाड, पोलिस हवालदार राजेंद्र खिल्लारे, सुनिल पवार, दिपक गडगे, पोलिस नाईक शांताराम कसबे, यलप्पा पाटील, पोलिस शिपाई अशोक आहेर, विजय आव्हाड, महेंद्र मंजा, मिनीनाथ बढे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. आरोपी गुन्हा करून औरंगाबाद येथे पळून जाण्याच्या तयारीत होता. त्याच्याविरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात याआधी दुखापती करण्याचे दोन तर विनयभंगाचा १ गुन्हा दाखल असल्याची माहीती पोलिस निरीक्षक मदने यांनी दिली.