शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दिवशी KDMC ची विक्रमी वसुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 18:07 IST

KDMC : ही वसुली महापालिकेच्या इतिहासातील विक्रमी वसूली असल्याचा प्रशासनाने दावा केला आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे (KDMC) सन 2020-21 या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रकीय उद्दिष्ट 425 कोटी असताना मालमत्ता कर संकलन विभागाने एकूण 427.50 कोटी विक्रमी वसुली केली आहे. पालिकेच्या मालमत्ता कर संकलन विभागाने दि.31 मार्च रोजी एका ‍दिवसात तब्बल 10. 78 कोटींची वसूली करून या आर्थिक वर्षात एकूण 427 कोटीहून अधिक  वसुली केली आहे. ही वसुली महापालिकेच्या इतिहासातील विक्रमी वसूली असल्याचा प्रशासनाने दावा केला आहे. (KDMC's record recovery on the last day of the financial year)

15 ऑक्टोबर 2020 ते 15 जानेवारी 2021 या 3 महिन्याचे कालावधीकरीता 75 % व्याज माफीची अभय योजना  कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आली होती. या योजनेला करदात्यांनी उत्तम प्रतिसाद देत  या कालावधीत  230.85 कोटी वसूलीस हातभार लावला होता. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक व त्यांच्या कर्मचारी वर्गाने देखील पाणी बिलांच्या वसुली पोटी एकूण 66.94 कोटीची वसुली केली आहे. गतवर्षी ही वसूली 61.10 कोटी  इतकी होती. कोरोना साथीच्या या कठीण परिस्थितीतही महापालिकेच्या करदात्यांनी करांचा भरणा करुन महापालिकेस केलेल्या सहकार्याबाबत महापालिकेने  करदात्या नागरिकांचे आभार मानले आहेत. 

'करवसुली झाली असली तरी, शहरातील समस्याही लवकर मार्गी लावाव्यात'केडीएमसीचे आयुक्त डॉ  विजय सूर्यवंशी यांनी अनेकदा  आपल्या कामाची चुणूक दाखवली आहे. वास्तविक पाहता कोरोना काळात संपूर्ण यंत्रणा वेगवेगळ्या कामात गुंतलेली असताना कर वसुली करणे सोपे नव्हते. परंतु पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना इतर कामांना गती  मिळणे देखील आवश्यक होते. सूर्यवंशी यांच्या  कणखर नेतृत्वामुळे ही करवसुली झाली असली तरी शहरातील पाणी, रस्ते व कचरा समस्याही लवकरात लवकर मार्गी लावाव्यात अशी अपेक्षा करदाते नागरिक करत आहेत.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीkdmcकल्याण डोंबिवली महापालिका