केडीएमसीच्या क प्रभाग कार्यालयाचे लोकार्पण झाले, स्थलांतर रखडले

By मुरलीधर भवार | Published: February 20, 2024 06:39 PM2024-02-20T18:39:55+5:302024-02-20T18:40:15+5:30

महापालिकेच्या हद्दीत १० प्रभाग क्षेत्र कार्यालये आहे. या पैकी क प्रभाग कार्यालय हे यापूर्वी महापालिका मुख्यालयाशेजारीच असलेल्या जुन्या इमारतीत सुरु होते.

KDMC's C Ward office inaugurated, migration halted | केडीएमसीच्या क प्रभाग कार्यालयाचे लोकार्पण झाले, स्थलांतर रखडले

केडीएमसीच्या क प्रभाग कार्यालयाचे लोकार्पण झाले, स्थलांतर रखडले

कल्याण-कल्याण पश्चीमेतील आधारवाडी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या इमारतीतल अग्नीशमन केंद्र आणि क प्रभाग कार्यालय थाटले जाणार आहे. या इमारतीचे लोकार्पण नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. इमारतीचे लोकार्पण झाले असले तरी त्याठिकाणी क प्रभागाचे स्थलांतर झालेले नाही. त्यामुळे स्थलांतर कधी होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

महापालिकेच्या हद्दीत १० प्रभाग क्षेत्र कार्यालये आहे. या पैकी क प्रभाग कार्यालय हे यापूर्वी महापालिका मुख्यालयाशेजारीच असलेल्या जुन्या इमारतीत सुरु होते. ही इमारत धोकादायक झाल्याने क प्रभाग कार्यालय दामोदाराचार्य सभागृहाच्या ठिकाणी पहिल्या मजल्यावर सुरु करण्यात आले. ही जागा सर्व समावेश आरक्षणातून महापालिकेस प्राप्त झाली होती. तेव्हापासून त्याठिकाणी क प्रभाग कार्यालय सुरु होते. आत्ता आधारवाडी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीत क प्रभाग सुरु होईल असे महापालिकेने सांगितले.

इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १२ फेब्रुवारी रोजी करण्यात आले. त्याच्या दुसऱ््या दिवशीपासून क प्रभाग कार्यालय त्याठिकाणी सुरु होणे अपेक्षित होते. मात्र सुरु झालेले नाही. या संदर्भात आयुक्त इंदूराणी जाखड यांनी १२ तारखेलाच आदेश काढले आहे. त्या आदेशानुसार क प्रभाग कार्यालय नव्या इमारतीत स्थलांतरीत करण्याचे म्हटले होते. या आदेशाची अंमलबजावणी महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेली नसल्याचा मुद्दा शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक मोहन उगले यांनी उपस्थित केला आहे.

Web Title: KDMC's C Ward office inaugurated, migration halted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.