डोंबिवली : एका महिला कर्मचाऱ्याला कामावरून काढण्याची धमकी देत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील लिपिक भूषण पाटील याला गुरुवारी निलंबित करण्यात करणाऱ्या आले. पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी ही कडक कारवाई केली असून, पीडित महिलेच्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात पाटील विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धमकी देऊन मागणी मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात एका कामावरून भूषण पाटील आणि पीडित महिला कर्मचारी यांच्यात वाद झाला होता. यावेळी पाटील याने सर्वांसमक्ष तिला शिवीगाळ केली होती. त्यानंतर २० फेब्रुवारी रोजी रात्री पीडित महिला घरी असताना पाटील याने तिला फोन केला. "तुझ्या कामावरून काढण्याची ऑर्डर आली आहे, ती रद्द करायची असेल तर त्या बदल्यात मला काय देशील?" असे विचारत त्याने शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप पीडित महिलेने तक्रारीत केला आहे.
कोणताही पुरावा नष्ट होऊ नये म्हणून कारवाई
पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर महापालिका प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आयुक्त अभिनव गोयल यांनी पाटील याला निलंबित करण्याचे आदेश दिले. "पाटील विरोधात दाखल गुन्ह्याची चौकशी व्हावी, कोणताही पुरावा नष्ट होऊ नये आणि साक्षीदारांवर दबाव येऊ नये, यासाठी त्याला सेवेत ठेवणे हितावह नाही," असे आयुक्तांनी निलंबन पत्रात नमूद केले.
पालिकेची प्रतिमा मलिन
या प्रकारामुळे महापालिकेची जनमानसातील प्रतिमा मलिन झाली असून, सेवाशिस्तीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आयुक्तांनी व्यक्त केली आहे. या कारवाईमुळे महापालिकेतील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Web Summary : A clerk in Kalyan-Dombivli Municipal Corporation was suspended for allegedly demanding sexual favors from a female employee in exchange for not terminating her employment. A police case has been filed against him following her complaint. The commissioner ordered the suspension to prevent evidence tampering.
Web Summary : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका में एक क्लर्क को नौकरी से निकालने की धमकी देकर महिला कर्मचारी से यौन संबंध मांगने के आरोप में निलंबित कर दिया गया। शिकायत के बाद पुलिस ने मामला दर्ज किया। आयुक्त ने सबूतों से छेड़छाड़ रोकने के लिए निलंबन का आदेश दिया।