सीएनसीजीवर चालणाऱ्या २५ घंटागाड्या केडीएमसीच्या ताफ्यात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2022 03:49 PM2022-01-27T15:49:56+5:302022-01-27T15:50:09+5:30

महापालिकेने या गाड्या स्वच्छ भारत अभियानाच्या निधीतून खरेदी केल्या आहे. एका गाडीची किंमत सात लाख ३५ हजार

kdmc brought 25 garbage collecting vehicles running on CNC | सीएनसीजीवर चालणाऱ्या २५ घंटागाड्या केडीएमसीच्या ताफ्यात दाखल

सीएनसीजीवर चालणाऱ्या २५ घंटागाड्या केडीएमसीच्या ताफ्यात दाखल

Next

कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेने सीएनजी इंधनावर चालणाऱ्या २५ घंडागाड्या खरेदी केल्या आहे. या घंटागाड्यांचे काल प्रजासत्ताक दिनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागास २५ घंडागाडय़ा उपलब्ध झाल्याने महापालिकेच्या घंडा गाड्यांची संख्या वाढली आहे.

महापालिकेने या गाड्या स्वच्छ भारत अभियानाच्या निधीतून खरेदी केल्या आहे. एका गाडीची किंमत सात लाख ३५ हजार आहे. या पिकअप व्हॅन प्रकारातील गाडय़ा आहे. २५ पैकी १३ गाडय़ा कल्याण आणि १२ गाडय़ा डोंबिवलीकरीता दिल्या जाणार आहे. त्याच प्रमाणो सीएनजी इंधनावर चालणा:या आणखीन ५३ घंटागाड्या खरेदी करण्यात येणार आहे. प्रत्येक गाडीची किंमत ७ लाख ६५ हजार रुपये आहे. महापालिकेकडे आधीच्या ११४ घंडागाडय़ा आहे. त्यापैकी ४० गाड्यांचे आयुर्मान संपुष्टात आले असल्याने त्या बाद होणार आहे. ४० घंडागाडय़ा बाद झाल्या तरी नव्याने दाखळ झालेल्या २५ आणि आणखीन खरेदी केल्या जाणाऱ्या ५३ घंटा गाड्या पाहता. महापालिकेची घंडागाडय़ांची एकूण संख्या १५२ होणार होणार आहे. प्रत्येक प्रभागाला घंटागाडी उपलब्ध होणार आहे.

महापालिकेकडे असलेल्या आधीच्या गाडय़ा या डिङोलवर चालणा:या होत्या. डिङोल इंदनाची प्रति लिटर किंमत 1क्क् पेक्षा जास्त झाल्याने आत्ता डिङोलवर चालणाऱ्या गाड्या महापालिकेस परवडत नाहीत. महापालिकेस गोदरेज कंपनीने सीएसआर फंड दिला होता. या फंडातून महापालिकेस बारावे कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी कचऱ्यापासून सीएनजी इंधन तयार करण्याचा प्रकल्प तयार करुन दिला होता. हा प्रकल्प गोदरेज कंपनीने चालविण्यास असमर्थता दर्शविल्याने महापालिकेने त्यासाठी निविदा काढली आहे. या प्रकल्पातून पुरेशी सीएनजी उपलब्ध होऊ शकते. त्याच सीएनजी इंधनावर या गाड्या चालवण्याचा महापालिकेचा मानस असल्यीच माहिती घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी दिली आहे. सीएनजी प्रकल्प सुरु झाल्यावर महापालिकेचा इंधन खर्चाची बचत होणार आहे.

Web Title: kdmc brought 25 garbage collecting vehicles running on CNC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.