शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 10:33 IST

Kalyan Durgadi Fort : दुर्गाडी किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमले होते. यावेळी पोलिसांचा मोठा फोजफाटा तैनात करण्यात आला

कल्याण :  कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्यावर बकरी ईदच्या निमित्ताने मुस्लीम समुदायाने येथील मशिदीत नमाज अदा केली. मात्र, बकरी ईदच्या दिवशी येथील दुर्गाडी मंदिरात देवीच्या दर्शनासाठी बंदी घातली जाते. त्यामुळे या बंदीविरोधात आज दुर्गाडी किल्ल्याबाहेर एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना अशा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घंटानाद आंदोलन केले. तसेच, आम्हाला मंदिरात प्रवेश दिला जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहिल, अशीही भूमिका घेतली. 

दुर्गाडी किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमले होते. यावेळी पोलिसांचा मोठा फोजफाटा तैनात करण्यात आला. तसेच, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे यांचे कार्यकर्ते एकमेकांत मिसळू नयेत आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी हे दोन्ही गट वेगळे ठेवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. याशिवाय, पोलिसांनी दुर्गाडी किल्ल्यावर जाण्यापासून शिवसैनिकांना रोखले. यावेळी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच, बाळासाहेब ठाकरेंनी बंदीहुकूम मोडून देवीचे दर्शन घेतले होते. आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन आम्ही सुरुच राहील. कोणत्याही दिवशी देवीच्या मंदिरात प्रवेश करण्यासाठी बंदी असता कामा नये. देवीचं दर्शन घेणं हा हिंदूंचा हक्क आहे, असे आंदोलकांनी म्हटले आहे.

दुर्गाडी किल्ल्यावर देवीचं मंदिर आहे. तसेच त्याच परिसरात एक छोटी मशिदही आहे. त्या ठिकाणी मुस्लीम समुदाय बकरी ईदच्या निमित्ताने नमाज पठण करण्यासाठी येत असतो. त्यामुळे बकरी ईद निमित्त दोन धर्मामध्ये कोणतेही वाद होऊ नये, यासाठी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सकाळी मुस्लीम बांधव नमाज पठण करत असताना पोलिसांकडून हिंदु बांधवांना सकाळी दुर्गाडी किल्ल्यावर देवीच्या दर्शनासाठी बंदी घातली जाते. दरम्यान, ९० च्या दशकात आनंद दिघेंनी याचा विरोध करत या ठिकाणी घंटानाद आंदोलन सुरु केले होते. आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्तेही या ठिकाणी घंटानाद करताना दिसत आहेत. 

टॅग्स :kalyanकल्याणShiv Senaशिवसेना